ईद अल-फितर 2021 हा जगभरातील मुस्लिमांसाठी सर्वाधिक उत्सुक असलेला उत्सव आहे. या उत्सवाची ते आतुरतेने वाट पाहतात. इस्लामिक कॅलेंडर नुसार ईद-उल-फितर रमजानच्या अरबी महिन्यानंतर शव्वाल महिन्याच्या पहिल्या तारखेला साजरा केला जातो. ईदच्या दिवशी सकाळची प्रार्थना सुरू होते. ईदच्या नमाजात हजारो मुस्लिम जमतात आणि नमाज अदा करतात. या दिवशी गोड शेवय्यांसह अन्य पदार्थ बनवले जातात. यासाठीच त्याला 'मीठी ईद' असे सुद्धा म्हटले जाते.पाक रमजान महिना संपणार आहे, या आठवड्यात ईद साजरी केली जाईल. ईद-उल-फितरला मिठी ईद म्हणून ओळखले जाते. (Simple Mehndi Design For Eid al-Fitr : ईद-अल-फितर साठी हातावर काढा 'या' सोप्या अरेबिक मेहंदी डिझाईन )
रमजान ईद दिवशी मुस्लिम बांधव एकमेकांना गळाभेट देऊन एकमेकांना ईदी देतात. यंदा कोरोनामुळे आणि सोशल डिस्टंसिंगचे महत्व लक्षात आपण घरात राहूनच हा सणा साजरा करू शकतो. तसेच सोशल मिडियाद्वारे आपण एकमेकांना शुभेच्छा संदेशही पाठवू शकतो.खास त्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत हॅप्पी ईद ग्रीटिंग्स, हॅप्पी ईद इमेज, हॅप्पी ईद शायरी