Happy Dusshera 2019 Wishes (Photo Credits: File Image)

आश्विन शुद्ध दशमी म्हणजेच विजयादशमी (Vijyadashmi)  येत्या मंगळवारी म्हणजेच 8 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाणारा आहे. यालाच दसरा (Dussehra) म्हणून हि संबोधले जाते. शारदीय नवरात्रीचे (Navratri 2019) सांगता करत हा सण मोठ्या जल्लोषात साजरा होतो. भारतातातील काही भागात या दिवशी रामाने रावणाचा तर दुर्गा मातेने महिषासुर राक्षसाचा वध याच दिवशी केल्याचे मानले जाते, या अनुषंगाने वाईटावर चांगलायचा विजय म्हणून हा सण विजयादशमी  म्ह्णून ओळखला जाऊ लागला. दसऱ्याच्या दिवशी ज्ञानाची देवता अशी ओळख असलेल्या सरस्वतीचे व रक्षण करण्यासाठी करण्यात येणाऱ्या शस्त्रांची पूजन करण्याची रीत आहे. महाराष्ट्रात दसर्‍याला आपट्याची पाने वाटली जातात.

हिंदू संस्कृतीनुसार दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने नेहमीच खास मानला जातो, या दिवशी घरोघरी आंब्याची पाने आणि झेंडूच्या फुलांचे तोरण बांधून, रांगोळ्या काढून, गोडाधोडाचे जेवण करून एका प्रकारे आनंदोत्सव साजरा केला जातो. तर असा हा सण आणखीनच खास करण्यासाठी आम्ही आपल्यासाठी काही शुभेच्छापत्रे घेऊन आलो आहोत, हे अस्सल मराठमोळे संदेश, Wishes, Messages, WhatsApp, Faecbook किंवा SMS च्या माध्यमातून आपल्या कुटुंबातील सदस्यांना मित्रपरिवाराला व नातेवाईकांसोबत करून तुम्ही त्यांचा ही सण खास करू शकता.

संस्कृतीचा ठेवूनिया मान

वाटले सोनियाचे पान

स्वीकारताना ठेवा चेहरा हसरा

तुम्हा सर्वांना शुभ दसरा

विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा

Happy Dussehra 2019 Wishes (Photo Credits: File Image)

ठेवुनी चेहरा हसरा, दुख सगळे विसरा

सोनियाचा दिन आपुला, तो विजयादशमी दसरा

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Dussehra 2019 Wishes (Photo Credits: File Image)

Dussehra 2019: दसरा दिवशी आपट्याची पानं 'सोन्याच्या' स्वरूपात का वाटतात?

रावणाचा वध करुनी राम राज्याने दिला आसरा

संपवूनी रावण भ्रष्टाचाराचा, आनंदाने करू दसरा साजरा

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Dussehra 2019 Wishes (Photo Credits: File Image)

झेंडूची फुले, आंब्याची पाने घरोघरी तोरणे सजली

रंगबेरंगी रांगोळी सजली

नवरात्रीच्या नऊ दिवसाचा पूर्ण झाला प्रवास

आला दसऱ्याचा दिवस खास

तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा

Happy Dussehra 2019 Wishes (Photo Credits: File Image)

दसऱ्याच्या या शुभ दिनी तुम्हास आरोग्य धन संपदा लाभो ही सदिच्छा

सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Dussehra 2019 Wishes (Photo Credits: File Image)

पहा व्हिडीओ

कोणत्याही सणानुसार भारतामध्ये विविध प्रांतात दसरा आणि विजयादशमीचा सण सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. मात्र पद्धत कोणतीही असली तरी त्यातून आनंद मिळवणे महत्वाचे असते त्यामुळे ही शुभेच्छापत्रे शेअर करून तुमच्या जवळच्या व्यक्तींना दसऱ्याच्या शुभेच्छा नक्की द्या!