Dussehra 2021 Messages in Marathi : दसऱ्याच्या निमित्त मराठमोळ्या Wishes, Greetings, Quotes, WhatsApp Status मेसेज पाठवत द्या शुभेच्छा!
Dussehra Messages 2021 (Photo Credits-File Image)

 Happy Dasara Messages in Marathi:  येत्या 15 ऑक्टोंबरला देशभरात दसरा (Dasara) साजरा केला जाणारआहे. असत्यावर सत्याची मात आणि वाईटावर चांगल्याचा विजय असलेल्या विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जाणार आहे. प्रत्येक वर्षा दसरा (Dussehra) हा अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील शारदीय नवरात्रौत्सवाच्या दिवसात दशमीला साजरा केला जातो. असे म्हटले जाते की, विजयादशमीच्या दिवशी भगवान राम यांनी लंकापती रावण यांचा वध करुन विजय मिळवला होता. तसेच या दिवशी रावणाचा पुतळा तयार करुन त्याचे दहन केले जाते. या व्यतिरिक्त नवरात्रौत्सवाचा अखेरचा दसऱ्याचा दिवस असल्याने देवीचे विसर्जन केले जाते. रावणाचा पुतळा दहन करताना प्रत्येकजण संकल्प करतात. त्यानुसार आपल्यामधील वाइट गोष्टींचा अंत करुन उत्तम मार्गावर जाण्याचा निर्धार करतात.

सध्याच्या डिजिटल युगात लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा देत असतात. तर यंदाच्या दसऱ्याच्या निमित्त मराठमोळ्या Wishes, Messages, Greetings, Facebook Post, WhatsApp स्टेटससह मेसेज पाठवत द्या शुभेच्छा! (Navratri Kanya Pujan 2021 Gift Ideas: नवरात्री मध्ये कन्या पुजनाच्या दिवशी बालिकांना 'या' भेटवस्तू देऊन त्यांना करा खूष!)

नसे भय पराजयाचे

विजयाचे आम्हा वेड

लुटूनी सोने आनंदाचे

रोवितो प्रेमाची मुहूर्तमेढ

दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

Dussehra Messages 2021 (Photo Credits-File Image)

सोनेरी सुर्याची सोनेरी किरणे

सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस

सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा!

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Dussehra Messages 2021 (Photo Credits-File Image)

रम्य सकाळी

किरणे सोज्वळ अन् सोनेरी

सजली दारी

तोरणे ही साजीरी

उमलतो आनंद मनी

जल्लोष विजयाचा हसरा

उत्सव प्रेमाचा

मुहूर्त सोनेरी हा दसरा

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Dussehra Messages 2021 (Photo Credits-File Image)

मुहूर्त हसरा नवसंकल्पाचा,

सण दसरा हा उत्कर्षावा

चैतन्यास संजीवनी लाभोनी,

होवो साजरा मनी

उत्सव तो नवहर्षाचा

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Dussehra Messages 2021 (Photo Credits-File Image)

पहाट झाली, दिवस उजाडला

आला आला सण दसऱ्याचा आला

अंगणी रांगोळ्या, दारात तोरण

उत्सव हा प्रेमाचा, सोनं घ्या सोनं

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Dussehra Messages 2021 (Photo Credits-File Image)

वाईटावर चांगल्याच्या विजयाच्या या पवित्र उत्सवाचा विजय मुहूर्त सर्व कामात यशस्वी होतो आणि प्रत्येक कार्यात यश देतो. या दिवशी महिषासुर मर्दिनी देवी दुर्गा आणि मेरीदा पुरुषोत्तम श्री राम यांची पूजा शुभ मुहूर्तावर केली जाते. याशिवाय इलेक्ट्रॉनिक वस्तू, दागिने आणि कपड्यांची खरेदीही या दिवशी शुभ मानली जाते. एवढेच नाही तर या दिवशी कोणतेही नवीन काम सुरू केल्यास त्यात नक्कीच यश मिळते.