Navratri Rangoli Designs: नवरात्री (Navratri 2024) हा देवी दुर्गा आणि शक्तीच्या उपासनेचा सण हा भारतातील प्रमुख सणांपैकी एक आहे. हा सण केवळ भक्तीचेच नव्हे तर श्रद्धेचेही प्रतीक आहे. नवरात्रीत रांगोळी (Navratri Rangoli Designs) काढण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. रांगोळी घराचे प्रवेशद्वार तर सुंदर बनवतेच, पण ती शुभ, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानली जाते. या नवरात्रीमध्ये तुम्ही काही खास रांगोळी डिझाइन (Rangoli Designs) काढून या उत्सवाचा आनंद द्विगुणित करू शकता.
आज आम्ही तुमच्यासाठी काही खास रांगोळी डिझाइन्स घेऊन आलो आहोत. या डिझाइन्स तुम्ही तुमच्या घरासमोर, अंगणात काढून शकता. नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या थीमवर तुम्ही तुमची रांगोळी डिझाइन करू शकता. दररोज माँ दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाते. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री. त्यामुळे तुम्ही या नऊ रुपांची दररोज एक अशी देखील रांगोळी काढू शकता. (हेही वाचा - Shardiya Navratri 2024: शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बार्लीची पेरणी का करतात? कशी सुरू झाली परंपरा? वाचा A टू Z माहिती)
नवरात्री रांगोळी डिझाईन व्हिडिओ -
नवरात्रीत फुलांनी बनवलेल्या रांगोळ्यांना नेहमीच पसंती दिली जाते. ताजेपणा आणि नैसर्गिक सौंदर्य लक्षात घेऊन तुम्ही 2024 मध्ये फुलांचा वापर करून आकर्षक रांगोळी बनवू शकता. झेंडू, गुलाब आणि इतर फुलांनी रांगोळी काढल्याने ती अधिक आकर्षक दिसते.