Akshaya Tritiya 2022 Rangoli Designs: अक्षय्य तृतीयेचा हिंदू सण, ज्याला अक्षय तृतीया किंवा आखा तीज असेही म्हटले जाते. मंगळवारी अक्षय तृतीयाचा सण साजरा होणार आहे. हा सण हिंदू बांधव मोठ्या थाटामाटात साजरा करतात. अक्षय्य तृतीयेचा सण हिंदूंसाठी अत्यंत शुभ मानला जातो. यादिवशी सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. तसेच या दिवशी सोने खरेदी करणं शुभ मानलं जातं.
साधारण हिंदू धर्मात कोणत्याही सण आणि उत्सवाच्या दिवशी रांगोळी काढण्याला खूप महत्त्व आहे. कोणत्याही खास सणाच्या निमित्ताने घराचे अंगण सजवले जाते. जेणेकरून घरात लक्ष्मीचा वास राहतो. तुम्ही अक्षय तृतीयेनिमित्त तुमच्या घराच्या अंगणात तसेच देवघरासमोर खास रांगोळी काढ शकता. यासाठी तुम्हाला खालील व्हिडिओ नक्की उपयोगात येतील. (हेही वाचा - Akshaya Tritiya 2022: अक्षय्य तृतीया कधी आहे? तारीख, वेळ, शुभ मुहूर्त, पूजा मुहूर्त आणि Akha Teej चा शुभ दिवस साजरा करण्याचे महत्त्व काय? जाणून घ्या)
अक्षय तृतीया रांगोळी डिझाईन्स -
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. यासोबतच या दिवशी लग्न, गृहप्रवेश, खरेदीसाठीही शुभ मुहूर्त आहे. यंदा 3 मे, मंगळवारी म्हणजेच उद्या हा सण साजरा होणार आहे. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला हा उत्सव साजरा केला जातो. अक्षय्य तृतीयेला 3 राजयोग तयार झाल्यामुळे हा काळ आणखीनचं खास असणार आहे.