Akshaya Tritiya 2022: अक्षय्य तृतीया हा हिंदू धर्मग्रंथातील सर्वात शुभ सणांपैकी एक मानला जातो. जो वैशाख महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीयेच्या दरम्यान येतो. अक्टी किंवा आखा तीज म्हणून ओळखला जाणारा हा सण वसंत ऋतुमध्ये साजरा केला जातो. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी यज्ञ, पितृ-तर्पण, जप आणि दान केल्याने मिळणारा लाभ कधीही कमी होत नाही. तो कायमस्वरूपी व्यक्तीसोबत राहतो. हा सण हिंदू समुदायांद्वारे मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. अक्षय्य तृतीया 2022 मंगळवार, 3 मे रोजी साजरी होणार आहे. या धार्मिक प्रसंगी लोक त्यांच्या प्रियजनांच्या दिवंगत आत्म्याला आदरांजली वाहतात.
अक्षय्य तृतीया 2022 पुजेचा मुहूर्त -
द्रिक पंचांग नुसार, अक्षय्य तृतीया तिथी 03 मे 2022 रोजी 29:18+ पासून सुरू होईल, म्हणजेच ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये पुढील दिवशी सकाळी 5:08 वाजता आणि 04 मे 2022 रोजी सकाळी 07:32 वाजता समाप्त होईल. (हेही वाचा - Akshaya Tritiya 2022 Dos and Don’ts:अक्षय्य तृतीयेला काय करावे, काय करू नये, पाहा)
अक्षय्य तृतीयेचे विधी आणि महत्त्व -
हिंदू पौराणिक कथेनुसार, त्रेतायुगाची सुरुवात अक्षय्य तृतीयेच्या दिवशी झाली. याशिवाय, प्राचीन आणि पौराणिक इतिहासातील इतर असंख्य श्रद्धा आहेत. ज्या या दिवसाला महत्त्व का मानतात हे स्पष्ट करतात. जैन धर्मात, हा दिवस त्यांचा पहिला देव आदिनाथ यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. लोक असेही मानतात की अख्खा तीजच्या दिवशी भगवान गणेश आणि वेदव्यास यांनी महाभारत लिहायला सुरुवात केली. या दिवशी सोने आणि चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. कारण हे धातू धन आणि समृद्धीची देवी मां लक्ष्मीचे प्रतीक आहे. भारतीय संस्कृतीत लोक विशेषत: नवीन व्यवसाय, नवीन उपक्रम अक्षय्य तृतीयेच्या पवित्र प्रसंगी सुरू करतात.
यादिवशी बरेच लोक भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची प्रार्थना करतात आणि त्यांचे दैवी आशीर्वाद प्राप्त करतात. या दिवशी भगवान कृष्णाच्या मूर्तीला चंदनाच्या पेस्टने सुशोभित केले जाते. या दिवशी दानधर्म करणे, व्रत आणि विवाह समारंभ आयोजित करणे हे देखील पवित्र मानले जाते. अक्षय्य तृतीया सोमवारी आली तर हा सण अधिक शुभ मानला जातो.