Diwali Invitation Card Marathi Format: यंदाच्या दिवाळीत मित्रपरिवार, नातलगांना आमंत्रित करण्यासाठी WhatsApp Messages,Images च्या माध्यमातून शेअर करा या 'निमंत्रण पत्रिका'
Diwali Invitation Message (Photo Credits: File Image)

Diwali 2020 Online Marathi Invitation Cards: यंदा दिवाळीचा सण  25 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर दरम्यान साजरा केला जाणार आहे. सणाची खरी मजा कुटुंबीयांसोबत सेलिब्रेशनशिवाय पूर्ण होत नाही. मग दीपावलीचा उत्साह याला अपवाद कसा ठरेल?  त्यामुळे दिवाळीचा सण, फराळाचा बेत यामध्ये आपल्या मित्र परिवाराला, कुटुंबातील नातेवाईकांना आमंत्रित करून तुम्हीही सेलिब्रेट करण्याचे प्लॅनिंग करू शकता. एक लक्षात ठेवा, या मंडळींना आमंत्रित करताना फार फॉर्मल किंवा अगदीच साध्या पद्धतीचा वापर करू नका, याऐवजी आम्ही तयार केलेल्या निमंत्रण पत्रिका नमुन्याचा वापर करू शकता. एका हटके आणि थोड्या मजेशीर पद्धतीने आमंत्रण देण्यासाठी या काही नमुना पत्रिका नक्की तपासून पहा. आजकाल डिजिटल मीडिया आणि सोशल मीडियाचा बोलबाला असल्याने व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकच्या माध्यमातून आकर्षक आमंत्रण पत्रिका शेअर करून तुम्ही हे नमुना संदेश कस्टमाइझ करू शकता. Diwali 2020 Invitation Cards in Marathi: दिवाळीच्या शुभेच्छा देत मित्रमंडळी, प्रियजनांना फराळाचं ऑनलाईन आमंत्रण देण्यासाठी खास Messages Formats!

नमुना 1

दिवाळीचा दिन ,आनंद भरले मन

भेटून सारे जण, साजरा करू दिवाळसण

फराळासाठी आपल्या कुटुंबाला घेऊन नक्की या

तारिख / वेळ:

पत्ता:

टीप: येताना सोनपापडी घेऊन येऊ नका

Diwali Invitation Message (Photo Credits: File Image)

नमुना 2

पहिला दिवा लागे दारी

रोषणाईने उजळे रात्र सारी

रांगोळी, फटाके, फराळाची तर मजाच न्यारी

एकत्र येऊन दिवाळी करू साजरी

यंदा दिवाळीच्या शुभ पर्वाला सर्वांनी एकत्र मिळून सणाचा आनंद लुटुयात

आमच्यासोबत फराळाला नक्की या

पत्ता:ABC

तारीख/ वेळ:

नमुना 3

फटाक्यांची माळ, विजेची रोषणाई पणत्यांची आरास,

उटण्याची आंघोळ रांगोळीची रंगत, फराळाची संगत लक्ष्मीची आराधना,

दीपावलीचा सण आहे खूपच गोड.

या गोड सणाची रंगत वाढवण्यासाठी एकत्र येऊयात..

27 ऑक्टोबर रोजी फराळासाठी आमच्या घरी सहकुटुंब सहपरिवार नक्की या

पत्ता:

तारीख/ वेळ:

नमुना 4

चिवडा-चकली, लाडू-करंजीची लज्जत चाखण्यासाठी

आमच्या आनंदात तुमच्या उपस्थितीने आणखीन भर टाकण्यासाठी

यंदा 27 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 8 वाजता आपल्या कुटुंबासमवेत

आमच्या घरी नक्की भेट द्या..

पत्ता:

*-:नम्र* *विनंती:-*

यंदा आम्ही आदिवासी पाड्यावर जाऊन मुलांसाठी फराळ वाटप करणार आहोत, तुम्ही देखील या उपक्रमात सहभागी होऊ शकता

नमुना 5

आम्हाला आपणास कळविण्यास आनंद होत आहे की यंदा 27 ऑक्टोबर रोजी

दिवाळीच्या मुहूर्तावर सर्व मित्र परिवाराचे एक Get- Togather आयोजित केले आहे.

हा कार्यक्रम एका पॉटलक स्वरूपात असणार आहे, त्यामुळे येताना आपल्या हाताने बनवलेला एक पदार्थ घेऊन यावा.

आपले नम्र,

ठिकाण :

यंदाच्या दिवाळीच्या वेळापत्रकानुसार, वसुबारस आणि धनत्रयोदशी (25 ऑक्टोबर) तसेच नरकचतुर्थी आणि लक्ष्मीपूजन हे मुहूर्त (27 ऑक्टोबर) या एकाच दिवशी आले आहेत. मुख्य दिवाळी ही 27 तारखेला साजरी होणार असल्याने अनेकांच्या घरी पूजेचे आयोजन करण्यात आले असू शकते.अनायसे या दिवशी रविवार सुद्धा असल्याने एखाद्या छोट्या गेट टु गेदर साठी हा दिवस उत्तम पर्याय ठरू शकतो.