अवघ्या काही दिवसांवर दिवाळी आली आहे.आणि दिवाळी म्हटलं की घरातल्या साफ सफाई पासून ते अगदी घरातल्या भांड्यांपासून सगळ्याच गोष्टी साफ स्वच्छ कराव्या लागतात.घरच्या वस्तूंची भिंतींची साफ सफाई तर लवकर होते.पण सण म्हटले आणि त्यात दिवाळी असेल तर घरातील तांबे पितळेची भांडी आवर्जून वापरायला काढली जातात. घरात पितळेच्या भांडी ठेवणे शुभ मानले जाते.आरोग्याच्या दृष्टीकोणातून पितळ भांडीत तयार केलेल्या अन्नाला एक वेगळी चव असते तसेच हे आरोग्यासाठी उत्तम असतात.त्यामुळे सणासुदीला ही भांडी प्रत्येकाच्या घरात वापरली जातात.पण घरातील तांब्या पितळेची भांडी स्वच्छ आणि लखलखीत करणे हा प्रत्येक बाईसाठी टास्क असतो.पण आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्या वापरून तुम्ही घरातील तांबे आणि पितळेची भांडी कमी वेळात घरगुती पद्धतीने स्वच्छ आणि चकाचक करू शकाल. (No Shave November 2020 Meaning & Rules: ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ आणि 'मूव्हंबर' चा जगभरातील कर्करोगाच्या रुग्णांशी काय संबंध आहे? जाणून घ्या)
लिंबाच्या सालीपासून चकाचक करा तांब आणि पितळेची भांडी
साइट्रिक एसिड (Citric Acid) ने चमकवा तांब्याची भांडी
मीठ आणि चनाडाळीच पीठ वापरून भांडी स्वच्छ करा
हार्पिक (Harpic) वापरून भांडी चकचकीत करा
चिंच, मीठाचा वापर करुन स्वच्छ करा घरातील देवाच्या मूर्ति
अशा घरातील काही वस्तु वापरून तुम्ही तांबे पितळ आणि अगदी घरातील देवाच्या मुर्तीही कमी वेळात चकाचक करू शकता.तेव्हा या दिवाळीसाठी नक्की या टिप्स वापरून पहा.