Diwali 2020 Special Homemade Mithai: सण म्हटलं की मिठाई ही ओघाओघाने आलीच! गोड पदार्थांशिवाय, मिठाईशिवाय (Sweets) कोणताही सण अपूर्ण आहे. त्याचप्रमाणे दिवाळी (Diwali) सणाची गोड सुरुवात करण्यासाठी तसेच देवाला नैवेद्य म्हणून दाखवण्यासाठी मिठाई आणली जाते. ही मिठाई अनेक लोक दुकानात जाऊन खरेदी करतात. मात्र अलीकडच्या काळात भेसळीचे प्रमाण वाढले असल्यामुळे आपल्या आरोग्यावर त्याचा परिणा होऊ शकतो. यासाठी मनात काही शंका ठेवण्यापेक्षा तुम्हाला घरीच ही मिठाई बनवता आली तर? कल्पना थोडी अवघड वाटत असली तरी तुम्ही एकदा ही गोष्ट करायचे ठरवले तर तुम्ही अगदी सहजतेने घरच्या घरी छान तुमच्या सोयीप्रमाणे मिठाई बनवू शकता.
यात सर्वांची आवडती काजू कतलीसह (Kaju Katli), कलाकंद (Kalakand), खजूर बर्फी (Khajur Burfi), खोब-याची बर्फी (Coconut Burfi) यांसारखे अनेक पर्याय उपलब्ध होतील. पण ही मिठाई बनवायची कशी असा मोठा प्रश्न तुमच्यासमोर निर्माण होत असेल तर ती समस्या देखील पुढील व्हिडिओजा पाहून दूर होईल.
काजू कतली
खोब-याची बर्फी
कलाकंद
खजूर बर्फी
Instant बर्फी
काय मग कशा वाटल्या रेसिपीज? जर तुम्हाला कोरोना व्हायरसची भीती वाटत असेल तर घरच्या घरी रेसिपीज बनवून स्वादिष्ट मिठाई बनवून तुमची यंदाची दिवाळी तुम्ही गोड करु शकता. अशी घरगुती मिठाई बनवल्यास तुम्ही निर्धास्तपणे आणि मनसोक्त मिठाईचा आस्वाद घेऊ शकाल. शिवाय मिठाई बनवताना तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे गोडाचे प्रमाण कमी जास्त करु शकता.