 
                                                                 Diwali 2019: येत्या 27 ऑक्टोबरला दीपावली (Diwali) साजरी करण्यात येणार आहे. असं म्हटलं जातं की, दिवाळीला घराची स्वच्छता केल्याने घरात लक्ष्मी नांदते. तसेच आपल्या घरात काही अशाही वस्तू असतात, ज्या घरातील सुख-शांती नाहिशी करतात. त्यामुळे अशा वस्तू लवकरात-लवकर घराबाहेर फेकणे गरजेचे आहे. या वस्तू घराबाहेर फेकल्याने तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि लक्ष्मी नांदते. चला तर मग या खास लेखातून जाणून घेऊयात या वस्तूंविषयी...(Diwali 2019: धनतेरसच्या दिवशी ‘या’ गोष्टी आवर्जून केल्याने होईल ‘धनलाभ’)
घराचा तुटलेला दरवाजा बदला –
तुमच्या घराचा दरवाजा तुटलेला असेल तर दिवाळीपूर्वी तो दुरुस्त करून घ्या. कारण, दिवाळीला आपल्या घरात लक्ष्मी प्रवेश करत असते. तुटलेला दरवाजा अशुभ मानला जातो.

तुटलेली फोटो फ्रेम –
तुमच्या घरात तुटलेली फोटो फ्रेम असेल तर असा फोटो घराबाहेर फेका. तुटलेली फ्रेम घरात ठेवणे अशुभ मानले जाते. तुम्ही या फोटोला नवीन फ्रेमदेखील बसवून घेऊ शकता.
जुन्या दिव्यांचा वापर करू नका –
प्रत्येक दिवाळीला नवीन दिवे प्रज्वलित करा. मागील वर्षीची दिवे वापरू नका. दिवाळीला नवीन दिवे वापरणे शुभ मानले जाते.

फुटलेला आरसा –
तुमच्या घरात फुटलेला आरसा असेल तर लवकरात-लवकरात घराबाहेर फेका. फुटलेला आरसा घराबाहेर फेकल्याने तुमच्या घरात लक्ष्मीचा नांदेल. फुटलेला आरसा घरात ठेवणं अशुभ मानलं जातं. अनेकदा घरातील कपाटाच्या आरश्याच्या काचा फुटलेल्या असतात. या काचा लवकरात-लवकर दुरुस्त करून घ्या.

तुटलेले तसेच फुटलेले फर्निचर वापरू नका –
तुमच्या घरात तुटलेले तसेच फुटलेले फर्निचर असेल तर ते घराबाहेर फेका. त्याजागी नवीन फर्निचरची खरेदी करा. त्यामुळे तुम्हाला तुमचं घर अधिक प्रसन्न वाटेल.

तुमच्या घरात अशाप्रकारच्या तुटलेल्या वस्तू असतील तर लवकरात-लवकर त्या घराबाहेर फेकून द्या. तुटलेल्या कोणत्याही वस्तू अशुभ मानल्या जातात. (टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. लेटेस्टली मराठी यातुन कोणतीही अंधश्रद्धा पसरवू इच्छित नाही. )
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
