Dhulivandan 2021 Messages: फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री विधिपूर्वक होळी पेटवली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा होळी विझलेली असते, तेव्हा तेथील राख एकमेकांच्याअंगाला फासून खेळ खेळून नंतर आंघोळ करणे, याला धुलिकावंदन, धुलिवंदन किंवा धुळवड असे म्हणतात. फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवशी रंग खेळण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे आणि म्हणूनच हा दिवस रंगपंचमी म्हणून ओळखला जातो. परंतु उत्तर भारतातील परंपरा ही होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळण्याची आहे. होळी हा रंगांचा सण आहे. या दिवशी सर्व लोक आपले जुने राग रोष विसरून एकमेकांना रंग, गुलाल लावतात. लहान मुले आणि तरुणांमध्ये या दिवसाची जास्त उस्तुकता असते.
होळीच्या दुसर्या दिवशी उरलेल्या निखार्यांवर दूध, दही घालून शांत करतात व होलिकेचे भस्म कपाळाला लावतात. यादिवशी होळीची राख एकमेकांना लावण्याची पद्धत आहे. काही भागात धुलीवंदनाच्या दिवशीच रंगही खेळला जातो. या तीनही दिवशी लोक एकत्र येतात, आयुष्यातील दुःख काही काळ बाजूला ठेऊन चार आनंदाचे क्षण व्यतीत करतात. तर अशा या धुलीवंदनाच्या दिवशी काही HD Greetings, Wallpapers, Wishes, Images च्या माध्यमातून साजरा करा रंगपंचमीचा सण.(Holi 2020: धुळवड, रंगपंचमी खेळण्यासाठी घरच्या घरी आकर्षक नैसर्गिक रंग कसे तयार कराल? जाणून घ्या काही सोपे पर्याय)
>होळी पेटू दे,रंग उधळू दे,
द्वेष जळू दे,
अवघ्या जीवनात नवे रंग भरु दे
धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!
>भिजू दे रंग अन् अंग स्वच्छंदअखंड उठु दे मनी रंग तरंग
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळूया आज हे रंग
धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!
>आनंद, उत्साह आणि विविध रंगानी भरलेल्याधुलिवंदनाच्या सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
>खुलून येवो तुमच्या जीवनाचा प्रत्येक रंगरंगमंचमीच्या रंगानी बहरु द्या तुमचे अंतरंग
धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!
>रंगपंचमीचे रंग जणू, एकमेकांच्या रंगात रंगतातअसूनही वेगळे रंगानी, रंग स्वत:चा विसरुनी एकीचे महत्व सांगतात
धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!
यंदा होळीच्या सणावर कोरोना व्हायरसचं सावट असल्याने अनावश्यक गर्दीची ठिकाणं टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही यंदा होळी, धुळवड किंवा रंगपंचमीच्या मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करता येणार नाही आहे. तर राज्यसराकरने 28 मार्चपासून संचारबंदी सुद्धा लागू केली आहे.