दरवर्षी कार्तिक मास च्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला धनत्रयोदशी (Dhanteras) हा सण साजरा केला जातो.या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते आणि हा एक शुभ दिवस मानला जातो.या दिवशी सोने, चांदीचे दागिने, भांडी यासारख्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. यावर्षी धनत्रयोदशी 13 नोव्हेंबर रोजी म्हणजे शुक्रवार येत आहे. जाणून घेऊयात धनत्रयोदशी दिवशी पुजेचा शुभ मुहूर्त , धन्वंतरी व कुबेरांची पूजा कशी करायची आणि धनत्रयोदशी चे महत्त्व. (Diwali Cleaning Tips : दिवाळी साठी तांबा-पितळेची भांडी धुण्यासाठी काही घरगुती टिप्स)

धनत्रयोदशी दिवशी पुजेचा शुभ मुहूर्त 

यावर्षी धनत्रयोदशी 13 नोव्हेंबरला आहे आणि संध्याकाळचा कालावधी पूजेसाठी योग्य मानला जातो.संध्याकाळी 5 वाजून 28 मिनिटांपासून ५ वाजून 59 मिनिटे हा कालावधी पूजेसाठी शुभ आहे.या वेळात भगवान धन्वंतरीची पूजा केली जाऊ शकते.

धन्वंतरी व कुबेरांची पूजा

भगवान धन्वंतरी यांना हातात अमृत कलश धारण करणारे विष्णूचे रूप मानले जाते. त्यांना पितळ आवडते, म्हणून धनत्रयोदशी दिवशी पितळ किंवा इतर कोणत्याही धातुच्या वस्तूंची खरेदी केली जाते. धनत्रयोदशी दिवशी आरोग्याचे देवता धनवंतरी आणि श्रीमंत देवता कुबेर यांची पूजा केली जाते.

धनत्रयोदशी चे महत्त्व   

असे म्हणतात की कार्तिक महिन्यातील कृष्णपक्षांच्या त्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी समुद्र मंथन दरम्यान त्यांच्या हातात अमृत कलश घेऊन प्रकट झाले.असे मानले जाते की भगवान धन्वंतरि वैद्यकीय विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी अवतरित झाले. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने धन्वंतरि हा राष्ट्रीय आयुर्वेद दिन म्हणून साजरा केला आहे. पौराणिक मान्यतेनुसार धनतेरसच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्यास पैशाची आणि धान्याची कमतरता भासत नाही. आणि या दिवशी आणि लक्ष्मी-गणेशची मूर्ती देखील या दिवशी घरात आणावी.धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी दिवे लावण्याची प्रथा देखील आहे. याला यम दीपक असे ही म्हणतात जे यमराजसाठी प्रज्वलित केले जाते जेणेकरून अकाली मृत्यू टाळता येईल.