Deep Amavasya HD Images 2021: दीप अमावास्या निमित्त Messages, WhatsApp Status, Facebook Post, Wishes  पाठवून सज्ज व्हा श्रावणारंभासाठी
दीप अमावस्या (Photo Credits-File Image)

Deep Amavasya HD Images 2021:  दीप म्हणजेच दिव्याला भारतीय संस्कृतीमध्ये विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मीय आषाढी आमावस्येला (Ashadha Amavasya) दीप अमावास्या (Deep Amavasya) साजरी करतात. दीप अमावास्या म्हणजेच आषाढी अमावस्या होय. या दिवशी दीप पूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते. अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचं प्रतिक आहे. त्यामुळे अनेक चांगल्या-वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्त्व आहे.  Shravan Month 2021 in Maharashtra: महाराष्ट्रात श्रावणमासारंभ 9 ऑगस्ट पासून; श्रावणी सोमवार ते पोळा जाणून घ्या या पवित्र महिन्यातील सण, व्रतांच्या तारखा.

दीप अमावस्येला दीप पूजन केले जाते. त्यामुळे घरातील पितळेचे, चांदीचे दिवे घासून पुसून स्वच्छ केले जाते. पाटाभोवती रांगोळी काढली जाते. त्यानंतर पाटावर स्वच्छ कापड पसरून दिव्यांची मांडणी करतात. ते तीळ्याच्या तेलात किंवा तुपाच्या वातीने प्रज्वलित केले जातात. या दिव्यांची फुलं, नैवेद्या दाखवून पूजा केली जाते. दरम्यान अनेक ठिकाणी कणकेचे किंवा मातीचे दिवे लावून देखील दीप अमावस्या साजरी केली जाते. अनेक घरात या दिवशी पुरणाचे दिंड बनवून तो गोडाचा नैवेद्य बनवला जातो. तर  दीप अमावस्येसाठी Messages, WhatsApp Status, Facebook Post,, Wishes मित्रपरिवाराला पाठवून करा साजरी.(Happy Gatari 2021 Messages: गटारी निमित्त मराठी Wishes, Funny Jokes, Images शेअर करुन मासांहारप्रेमींना द्या शुभेच्छा!)

दीप अमावस्या (Photo Credits-File Image)
दीप अमावस्या (Photo Credits-File Image)
दीप अमावस्या (Photo Credits-File Image)
दीप अमावस्या (Photo Credits-File Image)
दीप अमावस्या (Photo Credits-File Image)

सण- संस्कृती आपल्या देशात मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. भारतामध्ये श्रावण महिना हा व्रत वैकल्यांचा आणि सण समारंभांची रेलचेल असल्याने 'राजा' म्हणून ओळखला जातो. यंदा अजूनही कोरोना व्हायरसचं संकट आपल्यावर घोंघावत असल्याने मंदिरांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या धुमधडाक्यात सण साजरा करता येणार नाही. मंगळागौरीच्या निमित्ताने रात्र जागवण्याचे भव्य कार्यक्रम होणार नाहीत. परंतू घराघरात दिवा लावून तुमच्या घरातल्या प्रत्येकासाठी, प्रियजण, नातलगांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना नक्की केली जाऊ शकते.