December 2019 Festival Calendar: चंपाषष्ठी, दत्त जयंती ते ख्रिस्मस; पहा डिसेंबर महिन्यातील सण आणि हॉलिडे लिस्ट!
December 2019 | Photo Credits: Pixabay.com

December 2019 Holiday List:  2019 वर्षातील शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर यंदा रविवार पासून सुरू होणार आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी सारेच सज्ज असतात.त्यासाठी विविध प्लॅन्स बनवले जातात. त्यामुळे सरत्या वर्षाला अलविदा म्हणत नव्या वर्षाची सुरूवात करण्यासाठी सारेच उत्साहात असतात. इंग्रजी कॅलेंडर मधील शेवटचा महिना सुरू होणार असला तरीही मराठी कॅंलेंडरमधील नववा म्हणजेच मार्गशीर्ष महिना (Margashisha) सुरू असल्याने या महिन्यात धार्मिक दृष्ट्या महत्त्वाच्या दिवसांची चंगळ आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला चंपाषष्ठी (Champashashti) , दत्त जयंती (Datta Jayanti), मौनी एकादशी, डॉ, आंबेडकर महापरिनिर्वाण दिन (Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din) तसेच ख्रिस्मस (Christmas) या सणांसोबतच 2019 वर्षातील शेवटचं ग्रहण देखील भारतीयांना डिसेंबर महिन्यात पाहता येणार आहे. मग पहा डिसेंबर 2019 मधील धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे दिवस, सण आणि हॉलिडे लिस्ट!

डिसेंबर हा सेलिब्रेशनचा महिना असल्याने अनेकजण या महिन्यात सुट्ट्या पाहून फिरायला बाहेर पडतात. आजकाल भारतामध्येही फेस्टिवल टुरिझमचं प्रस्थ वाढायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे पहा या महिन्यातील महत्त्वाचे दिवस. Khandoba Navratri 2019: जेजुरी गडावर आजपासून खंडोबा नवरात्रोत्सवाला सुरुवात; असा असेल संपूर्ण कार्यक्रम.

डिसेंबर 2019 मधील महत्त्वाचे दिवस

2 डिसेंबर - चंपाषष्ठी

6 डिसेंबर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन

8 डिसेंबर - मोक्षदा एकादशी

11 डिसेंबर - श्रीदत्त जयंती

15 डिसेंबर - संकष्टी चतुर्थी

25 डिसेंबर - नाताळ

26 डिसेंबर - सूर्यग्रहण

30 डिसेंबर - विनायक चतुर्थी

दरम्यान मार्गशीर्ष महिन्यात मांसाहार हा अनेकांसाठी निषिद्ध असतो. यंदा 19 डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्याची सांगता होत आहे. त्यामुळे त्यानंतरच लोकांना मासे, मटण- चिकनवर ताव मारता येईल. तर ख्रिस्मस देखील यंदा 25 डिसेंबर म्हणजे बुधवारी आल्याने नॉन व्हेज प्रेमींची चंगळ आहे. तर यंदा 31st ची नाईट मंगळवारी आहे. त्यामुळे तुम्ही सेलिब्रेशनचं प्लॅनिंग करणार असाल तर सुट्ट्याचं गणित आधिच जुळवून बघा.