Dr. Ambedkar Mahaparinirvan Din 2018 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनाची (Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Diwas ) सर्वत्र तयारी सुरु आहे. प्रामुख्याने मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात चैत्यभूमीवर देशभरातील आंबेडकर अनुयायी 6 डिसेंबर दिवशी मोठी गर्दी करतात. महापरिनिर्वाण दिन म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी. 6 डिसेंबर 1956 साली दिल्लीच्या निवासस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर बाबासाहेबांचं पार्थिव मुंबईच्या हिंदू स्मशानभूमी शिवाजी पार्क येथे आणण्यात आले. या ठिकाणी बौद्ध पद्धतीनुसार त्यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यात आले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुनायींसाठी BEST बस, रेल्वेच्या विशेष सुविधा
शिवाजी पार्क येथील चैत्यभूमीवर 1-7 डिसेंबर दरम्यान अनेक भीम अनुयायी भेट देऊन बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करतात. समाजातील अनुसूचित जाती, जमातींच्या लोकांना सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक स्तरावर सक्षम करण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी भरीव कामगिरी केली आहे. मागील वर्षांपासून मानवसमाजाप्रती शिस्तबद्ध मंगलमैत्री करून असा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्याचा मानस भीमअनुयायांनी केला आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी आणि त्यांच्या कार्याला मानवंदना म्हणून काही संदेश आणि व्हॉट्स अप स्टेटस (WhatsApp Status) सोबतच पहा डॉ. आंबेडकरांच्या कार्याचा गौरव करणारी लोकप्रिय भीमगीतं
WhatsApp Status :
यंदा देखील बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगर प्रशासनाने मुंबईत चोख व्यवस्था ठेवली आहे. वाहतुकीच्या रस्स्त्यांमध्ये बदल करण्यात आले आहे.