
Dr. Ambedkar Mahaparinirvan Din 2018 : बहुजन समाजाच्या हितासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं आयुष्य वेचलं. समाजातील अनुसूचित जाती जमातींच्या लोकांना समाजात शैक्षणिक, आर्थिक स्तरावर सक्षम करण्यामध्ये त्यांची भरीव कामगिरी आहे. 6 डिसेंबर 1956 साली डॉ आंबेडकर यांचं निधन झाले. मात्र आजही त्यांचे विचार समाजातील साऱ्याच घटकांना प्रेरणा देतात. मुंबईत बाबासाहेबांच्या पुण्यदिना निमित्त 1-7 डिसेंबरच्या काळात भीम अनुयायी श्रद्धांजली देण्यासाठी एकत्र येतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन विशेष मेसेज, WhatsApp स्टेट्स
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना साहित्यातून अनेक साहित्यकारांनी लोकांसमोर ठेवले तसेच संगीताच्या माध्यमातूनही बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करणारी काही गाणी लोकांच्या मनात आजही घर करून आहेत. त्यापैकी ही काही खास गाजलेली गाणी
यंदा ६३ व्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर भीम अनुयायींना दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहता यावी याकरिता खास सोया करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासन, बस यांची विशेष सोय आहे. वाहतुकीच्या मार्गामध्येही बदल करण्यात आले आहेत.