Dr. Ambedkar Mahaparinirvan Din 2018: डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण दिन निमित्त मुंबईत वाहतुकीच्या रस्स्त्यांमध्ये बदल
Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Diwas 2018 Traffic Advisory in Mumbai | Representational Image | Courtesy: Wikimedia/Mumbai Police

Dr. Ambedkar Mahaparinirvan Din 2018 : 6 डिसेंबर हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस (Dr. Ambedkar Mahaparinirvan Din). मुंबईतील शिवाजी पार्क (Shivaji Park)  परिसरामध्ये या 1-7 डिसेंबर या दिवसांमध्ये अनेक भीम अनुयायी चैत्यभूमीवर डॉ. आंबेडकरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येतात. यंदादेखील सामान्य नागरिकांना आणि भीम अनुयायींची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने चोख व्यवस्था ठेवली आहे. बेस्ट बस (BEST Bus) आणि रेल्वेने प्रवाशांसाठी खास सेवा ठेवली आहे. सोबतच वाहतुकीचे काही मार्ग बदलण्यात आले असून दादर, माहीम परिसरात काही रस्त्यांवर वाहतूक बंद करण्यात आली आहे.

बुधवार ( 5 डिसेंबर ) ते शुक्रवार (7 डिसेंबर ) या दिवसात दक्षिण -मध्य मुंबईतील काही वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत. महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुनायींसाठी BEST बस, रेल्वेच्या विशेष सुविधा

कोणकोणते मार्ग बंद राहतील ?

  • दादर पश्चिम येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग
  • रानडे मार्ग,
  • एन.सी. केळकर मार्ग,
  • केळुस्कर मार्ग,
  • गोखले रोड ,
  • टिळक पूल
  • एस.के. बोले मार्ग,
  • भवानी शंकर रोड या मार्गावर वाहनांना मज्जाव आहे.

वन वे वाहतूक सुरु असलेले मार्ग

  • सिद्धीविनायक मंदिर ते हनुमान मंदिर ( दादर पश्चिम)
  • भवानी शंकर रोड हनुमान मंदिर ते कबुतर खाना

केवळ अत्यावश्यक वाहनांना या मार्गावरून प्रवेश दिला जाईल. इतर वाहतूक माहीम जंक्शन मोरी रॉड मार्ग द्वारा सेनापती बापट मार्गावरून जाईल.