
भगवान दत्तात्रयांचा जन्मदिवस हा दत्त जयंती (Datta Jayanti) म्हणून साजरा केला जातो. यंदा 26 डिसेंबर दिवशी दत्त जयंती साजरी केली जाणार आहे. भगवान विष्णूंचा एक अवतार म्हणून दत्तांकडे पाहिलं जातं. अख्यायिकेनुसार, मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला त्यांचा जन्म झाल्याने मार्गशीर्ष पौर्णिमा दत्त जयंती म्हणून साजरी केली जाते. मग अशा या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तुमच्या आप्तांना, प्रियजणांना आज तुम्ही सोशल मीडीयामध्ये WhatsApp Status, Messages, Greetings, Quotes, HD Images नक्की शेअर करा.
दत्त जयंती दिवशी भक्तमंडळी 'गुरू चरित्रा'चे पारायण करतात. नजिकच्या दत्त मंदिरांना भेट देतात. महाराष्ट्रात माहुर, औंदुबर, गाणगापूर, नृसिंहवाडी, कुरवपूर ही महत्त्वाची दत्त क्षेत्रं आहेत. या ठिकाणी मोठ्या स्वरूपात दत्त जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. नक्की वाचा: Datta Jayanti Or Dattatreya Jayanti 2023 Date: दत्त जयंती कधी आहे? पूजा विधि, शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या .
दत्त जयंतीच्या शुभेच्छा

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद
वल्लभ दिगंबरा!!
धावत येसी भक्तांसाठी,
ब्रम्हा, विष्णू, महेश्वरा!!
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा
त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा
नेति नेति शब्द न ये अनुमाना
सुरवर-मुनिजन योगी समाधी न ये ध्याना
दत्त जयंतीच्या शुभेच्छा!

आता नको ही दिव्य दृष्टी
आता नको ही जड सृष्टी
फक्त असावी आपल्यावर
आपल्या सद्गुरूंची कृपादृष्टी
दत्त जयंतीच्या शुभेच्छा!

श्रीपाद श्रीवल्लभ अवधूतचिंतन
श्री गुरूदेव दत्त महाराज की जय!
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

चिंतन तुमचे सत्य चिरंतन
मिटवी सारी चिंता रे।
चिन्मय माझ्या चित्तातील
चैतन्य तूची दत्ता रे ॥
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
पुराणकथेनुसार, दत्तात्रेय हे अत्री ऋषी आणि अनुसया यांचा पुत्र होते. दत्तात्रयाला सृष्टीचे रचनाकार ब्रम्हदेव, पालनकर्ते विष्णू आणि लय करणारे भगवान शंकर यांच्या रूपात महेश यांचं स्वरूप मानलं जातं. त्यामुळे दत्तात्रेयाची उपासना ही उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीन शक्तीची उपसना असं मानलं जातं. मग या दत्त जयंती दिवशी तुम्ही काय करणार आहात? हे नक्की आमच्यापर्यंतही पोहचवा.