दत्त जयंती 2019 (Photo credits: File Image)

Datta Jayanti 2020 Songs: भगवान दत्तात्रेय यांची जयंती मार्गशीष महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजेच येत्या 29 डिसेंबरला साजरी केली जाणार आहे. तर दत्तात्रेय म्हणजेच त्रिदेव अर्थात ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे संयुक्त रुप मानले जाते. असे ही म्हटले जाते की, दत्त हे भगवान विष्णु यांचे अवतार आहेत. दत्त जयंती निमित्त संपूर्ण देशात मोठ्या भक्ती भावाने साजरी केली जाते. दक्षिण भारत आणि महाराष्ट्रात दत्त जयंत्तीचा सोहळा मोठ्या जल्लोषात केला जातो. याच कारणास्तव महाराष्ट्रात बहुसंख्येने दत्त संप्रदयातील लोक आपल्याला दिसून येतात.(Datta Jayanti 2020 Date: दत्त जयंती यंदा 29 डिसेंबर दिवशी; जाणून घ्या तिथी तारीख, वेळ)

पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. अशा असूर शक्तींचा नाश करण्यासाठी ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार, वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस `दत्तजयंती’ म्हणून साजरा करतात अशी कथा आहे. असे म्हणतात की दत्त जयंती ला दत्ततत्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते. तर यंदाच्या दत्त जयंती निमित्त 'ही' खास गाणी ऐकून भक्तीमय वातावरणात व्हा तल्लीन.(Datta Jayanti 2020: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरात दत्त जयंती साधेपणाने होणार साजरी; 2 जानेवारी पर्यंत भाविकांना प्रवेशबंदी)

>>दत्त दिगंबरा

>>धन्य धन्य हो प्रदक्षिणा

>>मंदिरात अंतरात तो 

>>मला हे दत्तगुरु दिसले

>>निघाले घेऊन दत्ताची पालखी

ही गाणी, भजने सदैव आपल्या ओठी राहतील अशीच आहे. मात्र दत्त जयंती च्या निमित्ताने ही गाणी आपल्या ओठावर आल्यास आपला आजचा दिवस खूपच मंगलमयी जाईल.