Christmas 2020 HD Images: जगभरात 25 डिसेंबरला म्हणजेच आज क्रिसमसचा सण मोठ्या आनंदात उत्साहात साजरा केला जाणार आहे. तर प्रभु ईसा मसीह चा जन्मदिवस म्हणून साजरा केला जाणारा हा सण ख्रिस्ती धर्मियांसाठी सर्वाधिक महत्वाचा सण मानला जातो. याच कारणास्तव क्रिसमसचा सण साजरा करण्यासाठी मोठी जय्यत तयारी केली जाते. या दिवशी लोक Secrete Santa बनून आपल्या प्रियजनांना गिफ्ट देतात. त्यामुळे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंच्या चेहऱ्यावर हसू फुललेले दिसून येते. नाताळच्या दिवसी क्रिसमस ट्री सजवले जाते. केक सह एकमेकांना चॉकलेट्स देत तोंड गोड केले जाते. या दिवशी बहुतांश जण आपल्या घरी पार्टीचे सुद्धा आयोजन करतात.(Christmas Party Dress Ideas For Kids: ख्रिसमस पार्टी साठी 'Red and White' ड्रेसमध्ये लहान मुलांना कसे तयार कराल? पाहा काही Tricky Ideas)
एकमेकांना आपल्या आनंदात सहभागी करण्याचा हा दिवस असल्याने सर्व धर्मियांकडून त्याची मजा घेतली जाते. क्रिसमस सणाच्या शुभेच्छा ही दिल्या जातात. जर तुम्हाला सुद्धा आपल्या मित्रपरिवाराला क्रिसमस पार्टीत सहभागी करणार नसल्यास त्यांनी ही शानदार शुभेच्छापत्र, HD Wallpapers, Wishes, Messages साजरा करा नाताळचा सण.(Christmas: असे काही देश जिथे ख्रिसमस 25 डिसेंबरला नव्हे, तर 7 जानेवारीला साजरा केला जातो; जाणून घ्या कारण)
येशूने दिलेली शिकवण अद्वितीय होती. त्या दिवसांतील लोक त्यांची शिकवण ऐकून आश्चर्यचकित झाले होते आणि आजही होत आहे. तेव्हापासून आजतागायत अनेकजण त्यांच्या शिकवणीमुळे प्रेरित होऊन चांगले जीवन जगत आहे. अनेकजण त्यांची शिकवण घेऊन इतरांना प्रोत्साहन देत आहे. अशा या पवित्र सणाच्या सर्वांना लेटेस्टली मराठी कडून खूप सा-या शुभेच्छा.