
Happy Chocolate Day 2024: व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) चा फीव्हर सध्या सर्वत्र आहे. प्रेमात पडलेली तरूणाई सध्या 14 च्या व्हेलेंटाईन डे पूर्वी व्हेलेंटाईन वीक (Valentine Week) साजरा करत आहे. या व्हेलेंटाईन वीक मध्ये प्रेम, नातं याच्याशी निगडीत एक खास दिवस साजरा केला जातो. 9 फेब्रुवारीला व्हेलेंटाईन वीक मध्ये चॉकलेट डे (Chocolate Day) साजरा केला जातो. सुख दु:खामध्ये चॉकलेट ही एक अशी गोष्ट आहे जी आपला मूड लिफ्ट करू शकते. चॉकलेट डे सेलिब्रेशन हे अर्थात आपल्या लव्ह पार्टनरला चॉकलेट्स देऊन करतात. तुमच्या दिवसाची सुरूवात थेट चॉकलेट देऊन आज करू शकत नसलात तरीही मराठमोळे मेसेजेस,WhatsApp Status, Stickers, GIFs, Messages पाठवून हा दिवस तुम्ही खास करू शकता.
व्हेलेंटाईन डे आणि सेलिब्रेशन म्हणजे गोड तर पाहिजेच. चॉकलेट शिवाय प्रेमाचं सेलिब्रेशन तसं अपूर्णच आहे. पण आता चॉकलेट्स अनेक स्वरूपात मिळतात. गोड प्रमाणेच कडू, व्हिगन, डाएट नुसारही चॉकलेट्स उपलब्ध आहेत. त्यामुळे तुमच्या पार्टनरला आज खूष करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. Valentine Week 2024 Date Sheet: व्हॅलेंटाईन वीक पूर्वी Rose ते Kiss Day; प्रेम साजरं करण्यासाठी 7 दिवसाचं सेलिब्रेशन पहा कोणत्या दिवशी?
चॉकलेट डे च्या शुभेच्छा !

चॉकलेट डे च्या गोड गोड शुभेच्छा

हॅप्पी चॉकलेट डे

किटकॅटचा स्वाद आहेस तू,
डेअरी मिल्कसारखी गोड आहेस तू,
कॅडबरीपेक्षाही खास आहेस तू,
काहीही असो माझी फाईव्ह स्टार आहेस तू…
हॅपी चॉकलेट डे

नातं चॉकलेट सारखं असावं,
कितीही भांडण झालं तरी
एकमेंकांमध्ये कायम गोडवा ठेवणारं…
हॅपी चॉकलेट डे

चॉकलेटपेक्षा चॉकलेटचा बंगला हवा
छोट्याशा माझ्या या जगात फक्त तुझा सहवास हवा
हॅप्पी चॉकलेट डे
चॉकलेट डे हा अनेक प्रकारे सेलिब्रेट करता येऊ शकतो. चॉकलेट हे आजकाल अनेक स्वरूपात उपलब्ध असल्याने गिफ्ट मध्येही अनेक पर्याय आहेत. व्हॅलेंटाईन डेला चॉकलेट्सची देवाणघेवाण करण्याची परंपरा व्हिक्टोरियन काळात लोकप्रिय झाली. या दिवशी स्त्री आणि पुरुष दोघेही एकमेकांना चॉकलेट देतात आणि त्यांच्या नात्यातील गोडवा आणखी एक पाऊल पुढे नेतात. रिचर्ड कॅडबरी, इंग्लिश चॉकलेटियर यांनी 19व्या शतकात व्हॅलेंटाईन डेसाठी हृदयाच्या आकाराचे चॉकलेट बॉक्स तयार केले आणि परंपरा लोकप्रिय करण्यात मदत केली. असं सांगितलं जातं.