Pandit Jawaharlal Nehru With Childrens (Photo Credits: Facebook)

Children's Day 2020: देशाचे पहिलेच पंतप्रधान जवाहरलाल नेहरु (Jawaharlal Nehru)यांच्या जन्मदिवशी म्हणजेच 14 नोव्हेंबरला प्रत्येक वर्षी 'बालदिन'  (Baldin) साजरा केला जातो. तर जवाहरलाल नेहरुन यांचे लहान मुलांवर अत्यंत प्रेम होते. याच कारणास्तव बालकांचा दिवस म्हणून बालदिन साजरा करण्याची देशात प्रथा सुरु झाली. तर पंडित जवाहरलाल नेहरु यांना लहान मुले चाचा म्हणून हाक मारत असत. मुले हिच देशाची घरी संपत्ती या दृष्टीकोनातून जवाहरलाल नेहरु यांनी नेहमीच लहान मुलांवर उत्तम संस्कार व्हावेत यासाठी प्रयत्न केले. मुलांच्या जडणघडीमध्ये पालकांसह त्यांच्या शिक्षकांचा सुद्धा फार मोलाचा वाटा असतो असे नेहरु यांना वाटायचे.(Children's Day Special: बालदिनाच्या निमित्त तुमच्या लहानग्यांना दाखवा 'ही' 5 मराठी बालनाट्य; गिफ्टसाठी ठरेल बेस्ट पर्याय)

बालदिन साजरा करण्यामागील मुख्य कारण म्हणजे असे की, पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. तर लहान मुलांच्या प्रति नेहरु यांचे असणारे जीवापाड प्रेम आणि त्यांच्यावरील माया पाहता त्यांच्या मृ्त्युनंतर त्यांना आदरांजली देण्याच्या हेतू भारत सरकारने हा दिवस बालदिन म्हणून घोषित केला. तर 27 मे 1964 रोजी सर्वांच्या मताने या दिवसाला मान्यता मिळाली होती. मात्र 1954 रोजी संयुक्त राष्ट्राने मुलांचे अधिकार आणि हक्क लक्षात घेता 20 नोव्हेंबर हा दिवस World Children's Day म्हणून घोषित केला गेला होता.(Children's Day Special Songs: बालदिना निमित्त बच्चे कंपनीसाठी त्यांची आवडती '10' बडबडगीते, नक्की ऐका)

दरम्यान, यंदाच्या वर्षात दिवाळीचा सण आणि बालदिन एकत्रित आल्याने बच्चेकंपनीची धम्मालच असणार आहे. कारण 14 नोव्हेंबर पासून देशभरात दिवाळीचा सण पुढील चार दिवस साजरा केला जाणार आहे. या दिवसानिमित्त बच्चेकंपनीला गिफ्ट्स ते नव्या कपड्यांपर्यंत अशा काही गोष्टी आई-बाबांकडून दिल्याने ते आधीच खुश असणार आहेत.  सर्वांना आयुष्य एकाच मिळते असे म्हटले जाते  तर यंदाच्या बालदिनानिमित्त तुमच्या आवडीची कोणतीही गोष्ट करा जेणेकरुन तुम्हाला पुन्हा एकदा बालपणात रमल्याचा आनंद मिळेल. त्याचसोबत लहानपण देगा देवा म्हणणाऱ्या सर्व मंडळींना सुद्धा बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!