Children's Day Special Songs: बालदिना निमित्त बच्चे कंपनीसाठी त्यांची आवडती '10' बडबडगीते, नक्की ऐका
Badbad Gite (Photo Credits: YouTube)

Children's Day 2019: लहान मुले म्हणजे देवाघरची फुले. या कोवळ्या फुलांनी जपणे, त्यांची काळजी घेणं, त्यांच्यावर चांगले संस्कार करणे हे प्रत्येक पालकांसाठी शिवधनुष्य पेलण्याइतकंच अवघड आहे. कारण आईच्या गर्भातून जगात आलेले हे लहान बाळाला आपण जसा आकार देऊ म्हणजे संस्कार देऊ तसे ते घडत असतात. आजच्या तंत्रज्ञानाच्या वेगवान जीवनात लहान मुलांवर मोबाईल, इंटरनेटचा प्रभाव इतका होत आहे की काही विचारायची सोय नाही. अशा या इंटरनेटला भाळलेल्या मुलांना बालदिनानिमित्त काही बडबडगीतांची ओळख करुन देण्याची संधी लेटेस्टली मराठीला मिळाली आहे.

कदाचित आपल्यापैकी ब-याच जणांना ही बडबडगीते माहितही असतील. विशेष करुन ज्या मुलांच्या पालकांनी मराठी माध्यमातून शिक्षण घेतले आहे ते आपल्या मुलांना ही गाणी नक्कीच शिकवत असतील.

ऐकूयात आठवणीत राहिलेली ही '10' उत्कृष्ट बडबडगीते:

1. चांदोबा चांदोबा भागलास का

2. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला

3. सांग सांग भोलानाथ

हेदेखील वाचा- Children's Day 2019: बालपण हरवून बसलेल्या आजच्या पिढीला उजळणी करुन देऊया जुन्या पिढीच्या 'या' खेळांची, बघा तुम्हाला आठवतात का?

4. मामाच्या गावाला जाऊया

5. ससा तो ससा की कापूस जसा

हेदेखील वाचा- Happy Children's Day 2019 Messages: बालपणीचे महत्व पटवून देणा-या या संदेशांच्या माध्यमातून आपल्या जिगरी दोस्तांना द्या बालदिनाच्या शुभेच्छा

6. नाच रे मोरा आंब्याच्या वनात

7. किलबिल पक्षी बोलती

8. शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा

9. लहान माझी बाहुली

10. बाहुलीचं लगीन झोकात लागलं

ही गाणी ऐकून आजचा दिवस नक्कीच चांगला जाईल असं म्हणायला हरकत नाही. आज या मराठी बडबडगीतांची जागा जरी 'Johny Johny आणि Twinkle Twinkle' या कवितांनी घेतली असली तरीही या बडबड गीतांची सर कशालाच येणार नाही. नाही का?