
Happy Children's Day Marathi Messages: कशाचीही पर्वा न करता अगदी स्वच्छंदी, निर्मळ, निखळ मनाने आयुष्यात येणारा काळ म्हणजे 'बालपण'. या बालपणाचे आणि विशेष करुन ते जगणा-या लहान मुलांचे विशेष कौतुक करण्याचा दिवस म्हणजे 'बालदिन' (Childrens Day). भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी म्हणजेच 14 नोव्हेंबर ला बालदिन साजरा केला जातो. जागतिक बालदिन हा 20 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. मात्र ज्यांना लहान मुले फार आवडायची त्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी हा दिवस साजरा करुन त्यांना लहान मुलांविषयी वाटणारे प्रेम आणि आदर व्यक्त केला जातो. लहान मुले हे उद्याचे उज्ज्वल भविष्य आहे हे लक्षात ठेवून या लहान मुलांचे कोडकौतुक करण्याचा दिवस म्हणजे बालदिन.
जे मुले बालपण अनुभवतायत किंवा ज्यांना हे बालपण अनुभवलय अशा सर्वांनाच या बालदिनानिमित्त शुभेच्छा देऊन या दिवसाचे मह्त्व आणखी वाढवण्यास मदत करतील हे शुभेच्छा संदेश:




बालकांनाही आयुष्याचा आनंद घेण्याचा, मौजमस्ती करण्याचा हक्क आहे आणि ह्या मुलांमधूनच देशाचे भावी सुशिक्षित आणि मनाने व शरीराने आरोग्यसंपन्न असे नागरिक तयार होणार आहेत. हा हक्क मिळालेल्या या सर्व बच्चेकंपनीला लेटेस्टली मराठी कडून बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा