
मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल षष्ठीचा दिवस हा चंपाषष्ठी (Champa Shashti) म्हणून ओळखला जातो. यंदा आज (9 डिसेंबर) ही चंपाषष्ठी साजरी केली जाणार आहे. मार्गशीर्ष महिन्यात प्रतिपदेपासून षष्ठी पर्यंत सहा दिवस मल्हारी मार्तंडच्या भक्तांमध्ये नवरात्र साजरी करण्याची पद्धत आहे. मार्तंड भैरव षडरात्रोत्सव म्हणून ही नवरात्र ओळखली जाते. मग या नवरात्रीची सांगता केली जाणारी चंपाषष्ठी निमित्त तुमचे नातेवाईक, मित्रमंडळी, प्रियजण आणि खंडोबाच्या भक्तांना सोशल मीडीयात व्हॉट्सअॅप (WhatsApp), फेसबूक (Facebook) द्वारा मराठी संदेश, शुभेच्छापत्र, ग्रीटिंग्स यांच्यामाध्यमातून पाठवू शकतो. मग आजच्या चंपाषष्ठीचा आनंद द्विगुणित करून खंडोबा नवरात्रीचा शेवटचा दिवस आनंदामध्ये साजरा करा.
चंपाषष्ठीचा उत्सव महाराष्ट्रात जेजुरी, पाली, गुड- गुड्डापूर/ देवरह या ठिकाणी साजरा केला जातो. सोबतच खंडोबा हे ज्याचं कुलदैवत आहे त्यांच्याकडे आजच्या दिवशी उत्साहाचं वातावरण असतं. मग तोच आनंद सोशल मीडीयामध्येही साजरा करा. नक्की वाचा: Margashirsha Guruvar Vrat HD Images: मार्गशीर्ष गुरूवार व्रताच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करत द्विगुणित करा आनंद.
चंपाषष्ठीच्या शुभेच्छा





यंदा चंपाषष्ठी सोबतच मार्गशीर्ष गुरूवारचं व्रताचा देखील पहिला गुरूवार आहे. त्यामुळे आज दुहेरी आनंदाचा दिवस आहे. खंडोबाने मणी आणि मल्ल यांच्या जाचातून लोकांना मुक्त केल्याने त्याच्या स्मरणार्थ चंपाषष्ठी दिवशी भगवान शंकर आणि त्यांच्या रूपातील खंडोबाची पूजा केली जाते.