हिंदू धर्मीयांसाठी मार्गशीर्ष (Margashirsha) हा धार्मिक दृष्ट्या महत्त्वाच्या महिन्यांपैकी एक आहे. मराठी कॅलेंडर नुसार हा नववा महिना आहे. 5 डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्याची सुरूवात झाल्यानंतर आता मार्गशीर्ष गुरूवार व्रतामधील आज (9 डिसेंबर) पहिला गुरूवार आहे. यावर्षी मार्गशीर्ष गुरूवार व्रताचे (Margashirsha Guruvar Vrat) 4 दिवस आहेत. त्यामधील पहिला गुरूवार आज आहे. मग या मंगलमय पर्वाच्या पहिल्या गुरूवारी तुमच्या प्रियजणांना, नातेवाईकांना, मित्रमंडळींना शुभेच्छा देत या दिवसाची आनंदामध्ये सुरूवात करण्यासाठी लेटेस्टली टीम कडून तयार करण्यासाठी मराठमोळी ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्र, Wishes, HD Images, Wallpapers शेअर करून या दिवसाचा आनंद द्विगुणित करा.
मार्गशीर्ष गुरूवार हा दिवस महालक्ष्मीच्या व्रतासाठी असतो. महालक्ष्मीच्या रूपात घटाची मांडणी केली जाते. घटाला आकर्षक स्वरूपात सजवलं जातं त्याची पूजा केली जाते. या निमित्ताने घराघरात आनंदाचं, चैतन्याचं आणि प्रामुख्याने मंगलमय वातावरण निर्माण होतं. मग तुम्ही देखील अशा मंगलमय वातावरणाचा सोशल मीडीयामध्येही आनंद द्विगुणित करू इच्छित असाल तर हे नक्की शेअर करू शकता.
मार्गशीर्ष गुरूवार व्रताच्या शुभेच्छा
मार्गशीर्ष गुरूवार व्रताच्या दिवशी काही जण दिवसभर उपवास करतात. संध्याकाळी लक्ष्मीमातेच्या पूजनानंतर उपवास सोडला जातो. या निमित्त घरात पूजा-अर्चना, आरती केली जाते. गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. मग हा आनंद जसा घराघरात साजरा केला जातो तसाच तो सोशल मीडीयामध्येही शुभेच्छापत्र शेअर करत साजारा करा.