Datta Jayanti 2024 Messages In Marathi 6 (फोटो सौजन्य - File Image)

Datta Jayanti 2024 Messages In Marathi: दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा ही दत्त जयंती (Datta Jayanti 2024) म्हणून साजरी केली जाते. यंदा 14 डिसेंबर रोजी दत्त जयंती साजरी करण्यात येणार आहे. पौराणिक कथांनुसार, दत्तात्रेय हे अत्री ऋषी आणि अनुसया यांचे पुत्र होते. दत्तात्रयाला सृष्टीचे रचनाकार ब्रम्हदेव, पालनकर्ते विष्णू आणि लय करणारे भगवान शंकर यांच्या रूपात महेश यांचं स्वरूप मानलं जातं.

महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहात दत्त जयंती साजरी केली जाते. दत्तात्रेय जयंतीच्या दिवशी लोक एकमेकांना सोशल मीडियाद्वारे दत्त जयंतीच्या शुभेच्छा पाठवतात. तुम्ही देखील Wishes, Wallpaper, Whatsapp Status द्वारा दत्त जयंतीच्या शुभेच्छा देऊन हा पवित्र दिवस आनंदाने साजरा करू शकता.

दत्त जयंतीच्या मंगलमय दिवशी

आपण सर्वांना आयुष्यात येणाऱ्या

संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळो

आणि आपल्या आयुष्यात काय सुखसमृद्धी येवो ही सदिच्छा!

Datta Jayanti 2024 Messages In Marathi 1 (फोटो सौजन्य - File Image)

दत्तगुरु माऊलीचा आशिर्वाद

तुम्हा सर्वांवर कायम असाच राहो

आणि तुमचे आयुष्य सुखात जावो ही सदिच्छा!

दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Datta Jayanti 2024 Messages In Marathi 2 (फोटो सौजन्य - File Image)

नाथांच्या नाथा..

सिद्ध समर्थ शुभंकारा..

नमितो तुज देवा..

शरण आलो कृपा करा..!!

दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Datta Jayanti 2024 Messages In Marathi 3 (फोटो सौजन्य - File Image)

दत्त येऊनी उभा ठाकला,

भावे साष्टांगेसी प्रणिपात केला

प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला,

जन्ममरणाचा फेरा चुकवीला

दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

Datta Jayanti 2024 Messages In Marathi 4 (फोटो सौजन्य - File Image)

आत्मसुखाचा मोक्ष लुटाया,

अमोल ठेवा हाती धरा

दत्तचरण माहेर सुखाचे,

दत्तभजन भोजन मोक्षाचे

दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Datta Jayanti 2024 Messages In Marathi 5 (फोटो सौजन्य - File Image)

दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र स्नान करून पूजेची जागा स्वच्छ करावी. तसेच भगवान दत्तात्रेयांची मूर्ती पाटावर ठेवावी. त्यांना गंगाजलाने स्नान घालावे. पांढऱ्या चंदनाचा तिलक लावावा. त्यांना फुलांचे हार आणि मिठाई इत्यादी अर्पण करा. तसेच ज्यांच्याकडे दत्तात्रेयजींची मूर्ती नाही, ते भगवान विष्णूची मूर्ती स्थापित करू शकतात. कारण काही लोकांच्या मते ते भगवान विष्णूचे अवतार होते.