Datta Jayanti 2024 Wishes In Marathi 6 (फोटो सौजन्य - File Image)

Datta Jayanti 2024 Wishes In Marathi: दत्तात्रेय जयंती (Dattatreya Jayanti 2024) हा हिंदू धर्मातील सर्वात शुभ दिवसांपैकी एक मानला जातो. हा दिवस भगवान दत्तात्रेयांना समर्पित आहे. दरवर्षी हा उत्सव मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. या शुभ दिवशी भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला असे मानले जाते, याला दत्त जयंती असेही म्हणतात. यावर्षी हा दिवस 14 डिसेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. असे मानले जाते की जे लोक हे व्रत करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच भगवान दत्तात्रेयांचा आशीर्वाद प्राप्त होतो.

दत्त जयंती निमित्त तुम्ही तुमच्या प्रियजनांना सोशल मिडियाच्या माध्यमातून शुभेच्छा संदेस पाठवू शकता. यासाठी आम्ही तुमच्यासाठी विशेष डिजिटल मेसेजे घेवून आलो आहोत. जे तुम्ही तुमच्या वॉलपेपर, कोट्स, स्टेटस, इमेजेसच्या माध्य़मातून शेअर करु शकता.

धावत येसी भक्तांसाठी,
ब्रम्हा, विष्णू, महेश्वरा!!
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!!
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Datta Jayanti 2024 Wishes In Marathi 1 (फोटो सौजन्य - File Image)

॥अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त॥
सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य, समृद्धी,शांती
तुमच्या जीवनी वसो, दत्ता चरणी ही प्रार्थना
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Datta Jayanti 2024 Wishes In Marathi 2 (फोटो सौजन्य - File Image)

दत्तकथा वसे कानी
दत्तमूर्ती ध्यानीमनी
दत्तालागी अलिंगना
कर समर्थ हे जाणा
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Datta Jayanti 2024 Wishes In Marathi 3(फोटो सौजन्य - File Image)

ज्याच्या ह्रदयात गुरु मूर्ती
त्याची होई जगभरात किर्ती
जो करेल गुरुची पूजा
त्याच्या आयुष्यातून संकटे होईल वजा ,
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Datta Jayanti 2024 Wishes In Marathi 4(फोटो सौजन्य - File Image)

गुरूवीण कोण दाखविल वाट,
आयुष्याचा पथ हा दुर्गम डोंगर घाट !
दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!

Datta Jayanti 2024 Wishes In Marathi 5 (फोटो सौजन्य - File Image)

हिंदू कॅलेंडरनुसार, मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा 14 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 4:58 वाजता सुरू होईल. त्याच वेळी, ही तारीख 15 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 2:31 वाजता संपेल. त्यामुळे यावर्षी दत्तात्रेय जयंती 14 डिसेंबर रोजी साजरी केली जाईल.