Merry Christmas 2024 Messages In Marathi : ख्रिश्चन धर्मात येशू ख्रिस्ताला देवाचा पुत्र मानले जाते आणि या धर्माच्या स्थापनेचे श्रेय देखील येशू ख्रिस्ताला जाते. येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस म्हणून साजरा केला जातो. ख्रिश्चन धर्माचे संस्थापक प्रभु येशू यांचा जन्मदिवस म्हणून नाताळचा सण साजरा केला जातो. असे मानले जाते की येशू ख्रिस्ताचा जन्म 25 डिसेंबर रोजी झाला होता. बायबलमध्ये येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अचूक तारखेचा उल्लेख नसला तरी चौथ्या शतकात रोमन सम्राट कॉन्स्टंटाईनने अधिकृतपणे 25 डिसेंबरला ख्रिसमस म्हणून मान्यता दिली. तेव्हापासून ख्रिश्चन धर्माचे लोक 25 डिसेंबरला ख्रिसमस साजरा करतात.
प्राचीन रोममध्ये, 17 ते 23 डिसेंबर दरम्यान Saturnalia नावाचा मुख्य उत्सव साजरा केला जात असे, जो सूर्य देवाला समर्पित मानला जात असे. यानंतर ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्या रोमन नागरिकांनी 25 डिसेंबर हा येशू ख्रिस्ताचा वाढदिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. येशू ख्रिस्ताचा जन्म देखील प्रकाश आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक मानले जाते. या दिवशी लोक एकमेकांना नाताळ सणाच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील ख्रिसमस वॉलपेपर, ख्रिसमसच्या शुभेच्छा, ख्रिसमस ग्रीटिंग्ज, ख्रिसमस स्टेटस, मेरी ख्रिसमस मेसेज शेअर करून आपल्या मित्र-परिवारास सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा पाठवू शकता.
मेरी ख्रिसमस मराठी मेसेज -
नाताळाचा सण,
सुखाची उधळण!
मेरी ख्रिसमस!
सर्व ख्रिस्ती बांधवाना नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा…
हा नाताळ आपल्या जीवनात
प्रेम आणि आनंदाचा प्रकाश आणो,
सर्वांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!
मेरी ख्रिसमस!
आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे
केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे
मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे
प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी असू दे
नाताळच्या शुभेच्छा!
प्रभूची कृपादृष्टी आपल्यावर नेहमी राहो,
आपल्या जीवनात प्रेम आणि सुख- समृद्धी येवो..
नाताळच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
या नाताळच्या सणाला
तुमचं जीवन ख्रिसमस ट्रीप्रमाणे हिरवंगार
आणि भविष्य चांदण्यंप्रमाणे चमचमणारं राहो.
नाताळच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
ख्रिश्चन धर्माच्या मान्यतेनुसार, प्रभु येशू ख्रिस्ताचा जन्म 25 डिसेंबर रोजी झाला होता. असे म्हटले जाते की, मेरीने एक स्वप्न पाहिले होते. ज्यामध्ये येशूच्या जन्माची भविष्यवाणी करण्यात आली होती. यानंतर काही काळानंतर मेरीने येशूला जन्म दिला.