BSF Raising Day 2020: बीएसएफ च्या 56 व्या स्थापना दिना निमित्त HD Images, Messages च्या द्वारे शुभेच्छा संदेश
Happy BSF Raising Day 2020 (Photo Credits: File)

BSF Raising Day 2020 Quotes: आपल्या देशाच्या रक्षणासाठी सीमेवर अहोरात्र तैनात राहून देशाची आणि देशवासियांचे रक्षण करणा-या BSF (Border Security Force) चा आज स्थापना दिवस. सीमा सुरक्षा दल हा जगातील सर्वात मोठे सुरक्षा दल आहे. देशात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी हे दल कार्यरत असते. वेळप्रसंगी आपल्या देशाच्या रक्षणासाठी बलिदान देण्याचीही या दलाची तयारी असते. आपला जीव धोक्यात टाकून देशाचे रक्षण करणा-या या दलाला सर्वात आधी लेटेस्टलीचा सलाम!!! भारतातील आंतरराष्ट्रीय सीमांवर पाहरा देणे, भारत भूमीची सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर होणारे गैरव्यवहार रोखणे हे या दलाचे काम आहे.

सीमा सुरक्षा दलाच्या स्थापना दिनानिमित्त एकमेकांना शुभेच्छा संदेश पाठवून देशाप्रती आणि BSE जवानांप्रती आदर आणि सन्मान व्यक्त करणे गरजेचे आहे. म्हणूनच पुढील दिलेले शुभेच्छा संदेश पाठवून आपल्या WhatsApp Status च्या माध्यमातून वा ग्रिटिंग्सच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश पाठवू शकता.

Happy BSF Raising Day 2020 (Photo Credits: File)

हेदेखील वाचा- जम्मू-काश्मीर: पाकिस्तानातील आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रे, दारूगोळा यांची तस्करीचा प्रयत्न BSF ने उधळून लावला, 58 अमली पदार्थांची पाकिटेही केली जप्त

Happy BSF Raising Day 2020 (Photo Credits: File)
Happy BSF Raising Day 2020 (Photo Credits: File)
Happy BSF Raising Day 2020 (Photo Credits: File)
Happy BSF Raising Day 2020 (Photo Credits: File)

1 डिसेंबर 1965 मध्ये सीमा सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत सुरक्षा दलात या तांत्रिक आणि आधुनिक बदल होत गेले. आज हे दल सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानासह आधुनिक शस्त्रांस्त्रांसह कार्यरत आहे. या सेवांचा सीमेच्या रक्षणासाठी फार उपयोग होतो. या BSF दलाला आणि देशाची त्यांच्या अमूल्य योगदानाला लेटेस्टलीचा सलाम!