Jammu Kashmir Arms Smuggling (Photo Credits: ANI/Twitter)

जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) मध्ये पाकिस्तानकडून (Pakistan) आणि दहशतवाद्यांकडून (Terrorist) कुरघोडी सुरु आहेत. मात्र या सर्वाला आपले भारतीय सैन्य (Indian Army) तोडीस तोड उत्तर देत आहेत. NCB विभागाकडून आलेल्या ताज्या अपडेट्सनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानातील आंतरराष्ट्रीय सीमेवरील अरनिया भागात शस्त्रे (Arms) , दारूगोळा (Ammunition) यांची तस्करीचा प्रयत्न BSF ने उधळून लावला. शनिवारी (19 सप्टेंबर) रात्री BSF जवानांनी ही कारवाई केली असून यात शस्त्रे, दारुगोळा आणि अमली पदार्थांची (Drugs) पाकिटे हस्तगत करण्यात आली आहे.

BSF ने केलेल्या या कारवाईत 2 पिस्तुल्स, 4 दारूगोळा, 58 अमली पदार्थांची पाकिटे जप्त करण्यात आली आहे. नारकोटिक्स विभागाने ही माहिती दिली आहे. Lashkar-e-Taiba Terrorists Arrested: जम्मूमधील राजौरी जिल्ह्यातून लष्कर ए तोयबा च्या 3 दहशतवाद्यांना अटक

दरम्यान काल जम्मूमधील राजौरी जिल्ह्यातून (Rajouri District Of Jammu Region) लष्कर ए तोयबाच्या (Lashkar-e-Taiba) च्या 3 दहशतवाद्यांना पकडण्यात जवानांच्या संयुक्त पथकास (Joint Team Of Security Forces) यश आलं आहे. या दहशतवाद्यांकडून 1 लाख रुपये आणि दोन AK-56 रायफल, 2 पिस्तुल, 4 ग्रेनेड जप्त करण्यात आलं आहे. BSF ने केलेल्या या कारवाईत 2 पिस्तुल्स, 4 दारूगोळा, 58 अमली पदार्थांची पाकिटे जप्त करण्यात आली आहे. नारकोटिक्स विभागाने ही माहिती दिली आहे.