
Happy Bhaubeej Wishes in Marathi: भावा-बहिणीच्या पवित्र नात्याला अजून घट्ट करणारा सण म्हणजे भाऊबीज (Bhai Dooj). या दिवशी बहिण भावाला ओवाळून त्याचे औक्षण करते आणि भाऊ बहिणीला ओवाळिणी स्वरुप तिचे आजन्म रक्षण करण्याचे वचन तिला देतो. तसेच ओवाळणीत काही भेटवस्तूही तिला देतो. तसेच बहिणही आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी देवाकडे प्रार्थना करते. दरवर्षीप्रमाणे यंदाही देशभरात भाऊबीजेचा सण साजरा केला जाईल. या मंगलदिनी आपल्या लाडक्या भावाला वा बहिणीला मेसेजेस, व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश पाठवून त्यांना भाऊबीजेच्या शुभेच्छा देऊ शकता.
या दिवसाचे महत्व अगदी थोडक्यात स्पष्ट करण्यासाठी आणि आपला भाऊ अथवा बहिण आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत याची जाणीव करुन देण्यासाठी मराठीतील हे खास शुभेच्छा संदेश तुम्ही नक्की पाठवू शकता. हेदेखील वाचा- Diwali 2020: यंदा दिवाळीच्या दिवशी 17 वर्षांनंतर सर्वार्थसिद्धि योग; पुष्य नक्षत्रापासून दिवाळी पर्यंत महत्त्वाच्या खरेदीचे 7 शुभ मुहूर्त!
बहिण भावाचा, सण सौख्याचा
देई वचन जन्मभर रक्षण करण्याचा
आपुलकीच्या नात्याचा, बंध प्रेमाचा
आला सण भाऊबीजेचा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

रक्षणाचे वचन प्रेमाचे बंधन
आठवूनि एकमेकांसोबत घालवलेले सुंदर क्षण
मिळून साजरी करू भाऊबीजेचा हा सण
भाऊबीजेच्या सर्वांना शुभेच्छा!

ओवाळिते तुज भाऊराया
कायम असू दे तुझी माझ्यावर माया
तुझ्यावर कधी न पडो दु:खाची काळी छाया
हेच मागणे तुझ्याकडे देवराया
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

उत्सव आपुलकीचा
उत्सव आनंदाचा
उत्सव बहिण भावाच्या प्रेमाचा
उत्सव नाती जपण्याचा
भाऊबीजेच्या सर्वांना शुभेच्छा!

भाऊबीजेच्या सणाचा उत्साह असाच कायम राहावा
अन् प्रत्येक बहिणीच्या मागे एकतरी पहाडासारखा भाऊ असावा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

असे म्हणतात की या दिवशी स्त्रियांमध्ये देवीतत्त्व जागृत होतं. अशा परिस्थितीत बहिणीच्या सानिध्यात राहण्याने तिच्या हाताने बनलेले पदार्थ खाल्ल्याने आणि तिच्याकडून ओवाळून घेतल्याने भावाला व्यावहारिक आणि आध्यात्मिक लाभ होतो.