
Eid-al-Adha Mubarak 2020: रमजान ईद पाठोपाठ मुस्लीम बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा सण म्हणजे बकरीद यंदा 31 जुलै पासून 1 ऑगस्टपर्यंत भारतामध्ये बकरी ईद साजरी केली जाणार आहे. दरम्यान बलिदानाचं प्रतिक समजली जाणारी ही ईद मुस्लीम बांधावांसाठी आवश्यक असते. मग यंदा कोरोना संकटकाळात ईदच्या दिवशी तुम्ही प्रियजणांना, नातेवाईकांना भेटू शकत नसाल तर तर सोशल मीडियामध्ये व्हॉट्सअॅप(WhatsApp), फेसबूकच्या (Facebook) माध्यमातून या सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी खास बकरीद मुबारक (Bakrid Mubarak ) असा संदेश देणारी ग्रीटिंग्स, मेसेजेस, शुभेच्छापत्र, HD Images, GIFs शेअर करून हा सण साजरा करूया!
बकरी ईद हा सण ईद उल-अजहा म्हणून देखील ओळखला जातो. या दिवशी सामुहिक नमाज अदा केली जाते. त्यानंतर एकमेकांना गळाभेट देत बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या जातात.
बकरीदच्या शुभेच्छा

ईद निमित्त तुम्हाला सर्वांना आनंद, समृद्धी लाभो
बकरीईद च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा
बकरीद मुबारक

बकरीद मुबारक!

अल्लाह आपको खु़दाई की सारी नेमतें दे,
अल्लाह आपको खुशियां और अता करे,
दुआ हमारी है आपके साथ,
बकरीद पर आप और सबाब हासिल करें.
बकरीद मुबारक!

मुबारक मौका अल्लाह ने अता फरमाया,
एक बार फिर बंदगी की राह पे चलाया,
अदा करना अपना फर्ज तुम खुदा के लिए,
खुशी से भरी हो ईद-उल-अजहा आपके लिए.
बकरीद मुबारक!

सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा
बकरीद मुबारक!
भारतामध्ये कोरोना संकटाचा कहर सुरू आहे. अशामध्ये नागरिकांमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मास्क घालणं, अनावश्यक गर्दी टाळणं तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. खरं तर सणाची खरी मज्जा आपण आपल्या माणसांसोबत राहून तो साजरा करण्यामध्ये आहे मात्र सध्या कोविड 19 ची परिस्थिती पाहता थोडं काळ प्रियजनांपासून दूर राहूनच व्हर्च्युअली हा सण साजरा करा.