
‘ईद-उल-अज़हा' (Eid al-Adha) हा मुस्लीम धर्मियांच्या प्रमुख सणांपैकी एक आहे. हा सण सर्वसामान्यपणे ‘बकरीद’ (Bakrid) म्हणून ओळखला जातो. जगभरातील सर्व भागांमध्ये मोठ्या उत्साहाने तो साजरा केला जातो. ‘ईद-उल-अज़हा’ सणाच्या तारखा या इस्लामिक कॅलेंडरवर आधारित असतात. बकरीद हा सण जिल्हिज महिन्यातील चंद्रदर्शनाच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो. 19 जून रोजी जिल्हीज महिन्याचा चंद्र दिसला, त्यानुसार यंदा गुरुवार दिनांक 29 जून रोजी बकरीद साजरी केली जाणार आहे.
इस्लामिक कॅलेंडरच्या 12व्या किंवा शेवटच्या महिन्यात बकरीद साजरी केली जाते. इस्लाम धर्मीयांसाठी हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात लोक हजसारख्या पवित्र यात्रेला जातात. यासोबत या महिन्यात ते मोठ्या प्रमाणावर दानधर्मही करतात. मुस्लिम मान्यतेनुसार बकरीद हा त्यागाचा सण आहे. मुस्लिम समाजामध्ये कुर्बानीला मोठे महत्व असून त्यासाठीच बकरीद साजरा केला जातो.
तर या सणाचे औचित्य साधत खास Images, Whatsapp Status, Wishes, Quotes, Greetings, Messages शेअर करून तुम्ही मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देऊ शकता.





मान्यतेनुसार, हजरत इब्राहिम हे अल्लाहाचे अनुयायी मानले जातात. एकदा अल्लाहने हजरत इब्राहिम यांच्या स्वप्नात येऊन त्यांना त्यांची सर्वांत प्रिय गोष्ट कुर्बान करण्यास सांगितले. इब्राहिम यांना त्यांचा मुलगा सर्वाधिक प्रिय होता. आदेशाचा पालन करण्यासाठी इब्राहिम आपल्या मुलाची कुर्बानी देऊ लागले मात्र त्यावेळी सुरीच चालेना. दुसरीकडे खुदाकडून फर्मान आले: मी तुझ्या या भक्तीने स्तिमित व प्रसन्न झालो आहे त्यामुळे पुत्राच्या ठिकाणी बकऱ्याची कुर्बानी दे. त्या दिवसापासून बकरी ईद सण सुरू झाला असे म्हणतात. (हेही वाचा: Bakri Eid 2023 Mehndi Designs: ईद-उल-अजहानिमित्त हातावर काढण्यासाठी सुंदर मेहेंदी डिझाईन, पाहा व्हिडीओ)
दरम्यान, या दिवशी लोक बोकडाचा बळी देतात. ज्या बोकडाचा बळी दिला जातो त्याचे तीन भाग केले जातात. त्यापैकी पहिला त्यागाचा एक भाग स्वतःसाठी ठेवला जातो, उर्वरित दोन भाग गरीब आणि जवळच्या लोकांना वाटले जातात.