![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/08/Teaser-3-380x214.jpg)
Happy Bail Pola 2020: महाराष्ट्रात श्रावण अमावस्येच्या दिवशी बैल पोळा (Bail Pola) साजरा केला जातो. यंदा शेतकर्यांसाठी मोठा आनंदाचा हा सण 18 ऑगस्ट दिवशी साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील पिठोरी अमावस्येला शेतकरी बांधव बैलांना सजवून त्यांची पुजा करून हा सण साजरा करणार आहेत. मग कृषीप्रधान असलेल्या भारत देशामध्ये बळीराजाचा महत्त्वाचा साथीदार असणार्या बैलाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पिठोरी अमावस्येला (Pithori Amavasya) बैलपोळा साजरा करण्यासाठी शेतकरी बांधवांना मराठमोळ्या शुभेच्छा, बैलपोळ्याचे मेसेजेस, Greetings, GIFs, HD Images यांच्या माध्यमातून शेअर करून द्विगुणित करा बळीराजाचा आनंद! बैल पोळा सण महाराष्ट्रात श्रावण अमावस्या दिवशी साजरा करण्याचं महत्त्व काय? जाणून घ्या पूजा विधी आणि परंपरा.
महाराष्ट्रात बैलपोळ्याच्या दिवशी घरातील बैलांना सजवून, गोडाच्या पदार्थांचा नैवैद्य दाखवून त्यांच्या ऋणाचे स्मरण केले जाते. महाराष्ट्रभर बैलपोळा साजरा करण्याच्या विविध पद्धती आहे. पण उत्साह सारखाच असल्याने आज शेतकरी आणि बैलांच्या मेहनतीच्या ऋण मानण्यासाठी आजचा दिवस साजरा करायला विसरू नका.
बैलपोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा
सर्व शेतकरी बांधवांना
बैल पोळा सणाच्या
हार्दिक शुभेच्छा!
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/08/Bail-Pola.jpg)
शेतामध्ये वर्षभर राबून
जो करतो धरणीमातेची सेवा
असे अपार कष्ट करतो
आपला सर्जाराजा
शेतकर्याच्या सच्चा मित्राला
बैला पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/08/Bail-Pola-2020.jpg)
तुझ्या अपार कष्टाने बहरते सारी भुई
एका दिवसाच्या पूजेने होऊ कसा उतराई ||
सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळा
सणाच्या हार्दिक शुभेच्छा
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/08/Happy-Bail-Pola.jpg)
आज पुंज रे बैलाले
फेडा उपकाराचं देनं...
बैला, खरा तुझा सन
शेतकऱ्या तुझं रीन
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/08/Bail-Pola-Marathi-Wishes.jpg)
कष्ट हवे मातीला
चला जपूया पशूधनाला
बैल पोळा सणाच्या शेतकरी बांधवांना
खूप खूप शुभेच्छा!
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/08/05-2-2.jpg)