
Bail Pola Messages in Marathi: उत्सवांचा, व्रतवैकल्यांचा महिना म्हणून ओळखल्या जाणा-या श्रावण महिन्याची सांगता पिठोरी अमावस्येने होते. हा दिवस महाराष्ट्रातील अनेक भागात बैल पोळा (Bail Pola) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बळीराजाचा सच्चा मित्र, सवंगडी असणा-या बैलाची पूजा केली जाते. दिवसरात्र मेहनत करून हा शेतकरी जगाचा पोशिंदा बनतो, या पोशिंद्याचा साथीदार म्हणजे त्याचा बैल. शेत नांगरणीपासून धान्याच्या मळवणी पर्यंत हा मुका जीव राबत असतो. आपल्या बळीराजाला बळ देत असतो.पण त्याचे हे योगदान कधीच अधोरेखित होत नाही. त्यामुळे मग सणाच्या निमित्ताने तरी निदान एक दिवस बैलाला पूजेचा मान देऊन नांगरापासून दूर ठेवले जाते. त्यामुळे या सणाच्या निमित्ताने बळीराजाचे आभार मानण्यासाठी त्यांना शुभेच्छा संदेश पाठवणे हा एक उत्तम पर्याय आहे.
कोरोना व्हायरसमुळे यंदा आपण दरवर्षीप्रमाणे हा उत्सव साजरा करू शकणार नाही. सोशल डिस्ंटसिंगचा विचार करता आपण घरात राहून Messages, Wishes च्या माध्यमातून एकमेकांना बैल पोळ्याच्या शुभेच्छा देऊ शकतो. Bail Pola Wishes in Marathi: बैल पोळ्याच्या शुभेच्छा मराठमोळे मेसेजेस, Wishes च्या माध्यमातून WhatsApp, Facebook वर शेअर करून खास करा बळीराजाचा सण!
बैल पोळ्याचा हा सण
सर्जा राजाचा हा दिन
बळीराजा संगे जो राबतो रात-दिन
सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण
बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

जसे दिव्याविना वातीला
आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय
तसेच कष्टाविना मातीला
आणि बैलाविना नाही शेतीला पर्याय
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा

नको लावू फास बळीराजा आपुल्या गळा
दे वचन आम्हास आज दिनी बैल पोळा
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

आज पुंज रे बैलाले
फेडा उपकाराचं देणं
बैला खरा तुझा सण
शेतक-या तुझं रीन
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

आला आला रे बैल पोळा गाव झालं सारं गोळा
सर्जा राजाला घेऊनी सारे जाऊया राऊळा
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा

आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून असणाऱ्या बळीराजाच्या पाठीचा कणा म्हणजे बैल, या खास दिवशी बैलाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. अशा या पवित्र सणाच्या महाराष्ट्रातील तमामा शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा!