Ashadhi Ekadashi 2022: आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलभक्तांसाठी खास डिजिटल शुभेच्छा, सोशल मीडियातून करा शेअर करा भक्तीमय आनंद
Vitthal Rukmai (विठ्ठल रखुमाई) (Photo Credits: Twitter)

पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाईच्या मंदिरापासून ते गल्लीबोळ्यातील विठ्ठल मंदिरं देखील आषाढी एकादशीच्या निमित्ताने उजळून निघतात. यंदा  10 जुलैला आषाढी एकादशी  साजरी केली जाणार आहे.  या निमित्ताने वारकरी, विठू माऊलींच्या भक्तांनी महिना भरापूर्वीपासून वारीत सहभाग घेतला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आषाढ एकादशीला दिंड्या पंढरपूरात पोचतात. खानदेश ,मराठवाडा, विदर्भ , आणि मध्यप्रदेशातून या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात भाविक सामील झालेले आहेत. कोरोना काळानंतर तब्बल दोन वर्षांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी पालखी सोहळा सुरु झाला आहे. यंदाची वारी निर्बंधमुक्त असल्यामुळे भाविकांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

या आषाढी एकादशीच्या सोहळ्यात थेट तुम्ही पंढरी गाठू शकत नसलात तरी  सोशल मिडीयावरून  शुभेच्छा देऊ शकता. आम्ही तुमच्यासाठी विशेष डिजीटल शुभेच्छा घेवून आलो आहोत त्या तुम्ही तुमच्या सोशल मिडीयाच्या माध्मातून सहज शेअर करु शकता. (हे ही वाचा:-Ashadhi Ekadashi 2022 : लाडक्या विठूरायाचं करा भक्तीभावाने स्वागत, आषाढ एकादशी निमित्त साकारा खास रांगोळ्या)