14 फेब्रुवारी दिवशी व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) चं सेलिब्रेशन झाल्यानंतर दुसर्या दिवसापासूनच मागील आठवड्याभरापासून सुरू असलेले लव्ही डव्ही सेलिब्रेशनच्या अगदी विरूद्ध इमोशन्सचा आठवडा सुरू होतो. अॅन्टी व्हॅलेंटाईन वीकची (Anti-Valentine Week) सुरूवात कधी, कुणी आणि कशी केली हे ठाऊक नसलं तरीही त्याबाबत अनेकांच्या मनात मोठी उत्सुकता असते. अॅन्टी व्हॅलेंटाईन डे वीकची (Anti-Valentine Week) सुरूवात 15 फेब्रुवारी दिवशी स्लॅप डे पासून होते तर पुढे किक डे, परफ्युम डे, फ्लर्टिंग डे, कन्फेशन डे, मिसिंग डे आणि शेवट ब्रेक अप डे ने होतो. या प्र्त्येक इमोशनमध्ये निगेटिव्हीटी आहे. मग पहा या संपूर्ण आठवड्याच्या सेलिब्रेशनमध्ये कधी कोणता दिवस साजरा केला आहे याचं वेळापत्रक पहा.
व्हॅलेंटाईन डे वीक मध्ये एकमेकांवर जसा प्रेमाचा वर्षाव केला जातो तसा अॅन्टी व्हॅलेंटाईन वीक मध्ये ज्यांना या लव्ही डव्ही सेलिब्रेशनमध्ये काही इंटरेस्ट नाही ते आता अॅन्टी व्हॅलेंटाईन वीक सेलिब्रेट करू शकतील. Valentine Day 2020 Horoscope: कोणत्या राशींना यंदाचा व्हॅलेनटाईन डे असणार खास, जाणून घ्या तुमचे भविष्य.
अॅन्टी व्हॅलेंटाईन वीक 2020
स्लॅप डे - 15 फेब्रुवारी 2020
किक डे - 16 फेब्रुवारी 2020
परफ्युम डे - 17 फेब्रुवारी 2020
फ्लर्टिंग डे - 18 फेब्रुवारी 2020
कन्फेशन डे - 19 फेब्रुवारी 2020
मिसिंग डे - 20 फेब्रुवारी 2020
ब्रेक अप डे - 21 फेब्रुवारी 2020
प्रेम ही आयुष्याला समृद्ध करणारी भावना आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यातही तितकेच निर्मळ प्रेम येईल यासाठी प्रयत्न करा. अॅन्टी व्हेलेंटाईन वीक हा नकारात्मक भावनांचा आठवडा आहे त्यामुळे त्याला फार गांभीर्याने घेऊ नका. या आठवडा म्हणजेच तुमच्या आयुष्यातून तुम्ही गमावलेल्या प्रेमावर फ्रस्टेशन काढण्यासाठी असतो पण त्याचा अर्थ खरंच कुणाला मारण्यासाठी, फटकवण्यासाठी नसतो. पण या आठ्वड्यामध्ये तुम्ही हेल्दी फ्लर्टिंग किंवा अजूनही प्रेमाची कबुली दिली नसेल तर ती व्यक्त करण्याची एक संधी आहे. त्यामुळे त्याचं सेलिब्रेशन तुम्ही नक्की करू शकता.