Angarki Sankashti Chaturthi November 23 Chandroday Timings: मुंबई, पुणे सह तुमच्या शहरात आज अंगारकी संकष्टी चतुर्थी च्या व्रताची सांगता करण्यासाठी पहा चंद्रोदयाची वेळ काय?
Lord Ganesha (Photo credits: File image)

गणेशभक्तांसाठी संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi) हा दर महिन्यात येणारा एक मंगलमय दिवस असतो. जेव्हा संकष्टी चतुर्थी आणि मंगळवार हा योग जुळून येतो तेव्हा त्याचं महत्त्व द्विगुणित होतं. यंदा नोव्हेंबर महिन्यात अंगारकी संकष्टी चतुर्थीचा (Angarki Sankashti Chaturthi) योग आहे. आज 23 नोव्हेंबर दिवशी अंगारकी आहे. त्यामुळे तुम्हीही गणेशभक्त असाल तर तुमच्यासाठी आजचा दिवस खास आहे. अनेक जण संकष्टीच्या दिवशी एक दिवसाचा उपवास करून बाप्पासाठी व्रत ठेवतात. गणपती बाप्पाच्या आराधनेसाठी उपवास आणि चंद्रदर्शन हे एक गणितचं आहे. त्यामुळे आज तुम्ही विधिवत अंगारकी संकष्टी चतुर्थीचा उपवास करत असाल तर पहा आज संध्याकाळी किती वाजता चंद्रदर्शनानंतर तुम्ही या उपवासाची सांगता करू शकता?

चंद्र दर्शन हे प्रत्येक शहरानुसार वेगवेगळे असते त्यामुळे तुम्हांला उपवास सोडण्याच्या वेळा देखील वेगवेगळ्या आहेत. मग आज जाणून घ्या तुमच्या शहरानुसार नेमकी कधी होणार चंद्रदर्शन? नक्की पहा: Shree Siddhivinayak Temple Live Darshan On Angarika Chaturthi: आज अंगारकी संकष्टी चतुर्थी इथे घ्या सिद्धिविनायकाचं लाईव्ह दर्शन .

अंगारकी संकष्टी चतुर्थी 2021 चंद्रदर्शन वेळ

मुंबई: रात्री 9.06

पुणे: रात्री 9.03

रत्नागिरी: रात्री 9.08

गोवा: रात्री 9.10

कोल्हापूर: रात्री 9.05

नाशिक: रात्री 8.59

नागपूर: रात्री 8.35

बेळगाव: रात्री 9.06

अंगारकीचा योग वर्षातून 2-3 वेळेसचं येतो. आजची अंगारकी ही 2021 मधील शेवटची अंगारकी आहे. मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि विघ्न दूर ठेवण्यासाठी अंगारकी संकष्टीचं व्रत केले जाते. काहींच्या धार्मिक मान्यतांनुसार, ज्यांना प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थीचं व्रत करणं शक्य नाही अशांना त्या सार्‍या व्रतांचं पुण्य आजच्या एका अंगारकी संकष्टी चतुर्थी मध्ये मिळू शकते. अंगारकी दिवशी बाप्पाची विधिवत पूजा करून नैवेद्याला मोदकांचा प्रसाद बनवला जातो.