आंगणेवाडी जत्रा (Photo Credits-Facebook)

आंगणेवाडी जत्रा (Anganewadi Jatra) येत्या 17 फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे. या जत्रेसाठी राज्यातील विविध ठिकाणाहून भाविक मोठ्या संख्येने उपस्थिती लावतात. तसेच जत्रेसाठी जय्यत तयारी करण्यात आली असून त्याचे काम अंतिम टप्प्यावर आले आहे. आंगणेवाडीची जत्रेच्या उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात येत असल्याने भाविकांसाठी या दरम्यान सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यात येतात. तर जत्रेसाठी भाविकांना महिला आणि पुरुषांसाठी वेगळी रांग सुद्धा सुरु करण्यात येणार आहे. पण जेष्ठ नागरिक, दिव्यागांसाठी स्वतंत्र रांग ही असणार आहे. त्याचसोबत दिव्यांगांना मंदिरापर्यंत जाण्यासाठी रिक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे.

श्री भराडी देवीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच सुरुवात होते. तर भाविकांना कमी वेळात दर्शन घेता यावे म्हणून आंगणे कुटुंबियांकडून विशेष सुविधा भाविकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मालवण आणि कणकवली विमानतळाहून येणाऱ्या दिव्यांगांना थेट मंदिरापर्यंत पोहचवण्यासाठी रिक्षाची सोय करुन देण्यात आली आहे.(Anganewadi Jatra 2020: भराडी देवीचा गोंधळ ते ताट लावण्याची प्रथा आंगणेवाडी जत्रेमध्ये असते या 8 गोष्टींचं आकर्षण!)

 आंगणेवाडीमधील भराडी देवीला केवळ सामान्य नागरिक नव्हे तर राज्यातील अनेक बडे नेते, कलाकार मंडळी हजेरी लावतात. त्यामुळे या दीड दिवसाच्या जत्रेमध्ये देवीचा गोंधळ, उपवास, नैवेद्य ते सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही वेगळेपण दिसून येते. यंदादेखील कोकणात जाण्यासाठी मध्य रेल्वेकडून कोकण रेल्वे मार्गावर आंगणेवाडीच्या भराडीदेवी जत्रेनिमित्त विशेष ट्रेन्स चालवल्या जाणार आहेत. दरम्यान रेल्वे प्रशासनासोबत एसटी महामंडळ आणि अन्य वाहतूक सेवादेखील वाढवण्यात आल्या आहेत.