Anganewadi Bharadi Devi Jatra 2019: आंगणेवाडी भराडी देवी जत्रा 2019 यंदा 25 फेब्रुवारीला भरणार!
आंगणेवाडी भराडी देवी यात्रा 2019 (Photo Credits : File Photo)

Anganewadi Bharadi Devi Jatra 2019:  कोकणवासियांचं श्रद्धास्थान असलेल्या आणि नवसाला पावणारी देवी म्हणून ओळख असणारी आंगणेवाडीच्या भराडीदेवीची (Anganewadi Bharadi Devi) सर्वत्र ख्याती आहे. कोकणवासीयांना तिच्या वार्षिक जत्रेची विशेष उत्सुकता असते. यंदा आंगणेवाडीच्या देवीची जत्रा  (Anganewadi Bharadi Devi Jatra ) 25 फेब्रुवारी 2019 यादिवशी असेल अशी घोषणा मंदिर प्रशासनाकडून करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आंगणेवाडीच्या जत्रेला देशभरातून भाविक येऊन दर्शन घेतात. यंदा फेब्रुवारी 2019 पर्यंत लोकसभेच्या तारखा जवळपास निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांसोबतच सामान्य नागरिकांसाठी या जत्रेसाठी चोख बंदोबस्त ठेवणं हे मोठं आव्हानात्मक ठरणार आहे. Anganewadi Bharadi Devi Jatra 2019: सामान्य कोकण वासियांपासून राजकारणी, कलाकारांपर्यंत सारेच हमखास भेट देणाऱ्या भराडी देवीच्या जत्रेबद्दल खास गोष्टी

देवीच्या कौलावर ठरते आंगणेवाडी देवी यात्रेची तारीख

महाराष्ट्रातील इतर जत्रेप्रमाणे आंगणेवाडीच्या देवीची जत्रा  ही तिथीनुसार किंवा विशिष्ट दिवसानुसार ठरवली जात नाही. आंगणेवाडी देवीच्या यात्रेसाठी देवीलाच कौल लावला जातो. सामान्यपणे मालवण जिल्ह्यातील गावकरी, मानकरी एकत्र येऊन डिसेंबर महिन्याच्या मध्यावर या देवीला कौल लावतात. यंदादेखील मंगळवार म्हणजे 18 डिसेंबर 2018 रोजी देवीने दिलेल्या कौलानुसार जत्रेची तारीख 25 फेब्रुवारी 2019 ही ठरवण्यात आली आहे.Anganewadi Bharadi Devi Jatra 2019: आंगणेवाडीच्या भराडी देवीला भोपळ्याच्या वड्यांचा प्रसाद , 'ताट लावणं' प्रथा म्हणजे काय?

सामान्य कोकणवासीयांसोबतच महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते,कलाकार मंडळी  या देवीच्या यात्रेला दरवर्षी हमखास भेट देतात. दीड दिवसाच्या जत्रेमध्ये दरवर्षी कोट्यांची उलाढाल होत असते.