Frank Kameny Google Doodle: प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ, LGBT कार्यकर्ते फ्रँक कॅमेनी यांच्या स्मरनार्थ गूगलने बनवले खास डूडल
Frank Kameny Google Doodle

गुगल (Google) नेहमीच आपल्या होम पेजवर खास असे डूडल (Doodle) साकारुन विविध व्यक्ती, प्रसंग, घटनांना आदींना उजाळा देत असते. विशेष म्हणजे गूगल डूडल (Google Doodle) हा नेहमीच उत्सुकतेचा आणि चर्चेचा विषय ठरतो. आजही गूगलने असेच डूडल साकारले आहे. अमेरिकेचे थोर खगोलशास्त्रज्ञ, दुसऱ्या महायुद्धातील दिग्गज व्यक्तिमत्व, समलैंगिक (Gay) आणि एलजीबीटी (LGBT) अधिकार कार्यकर्ते डॉ. फ्रँक कॅमेनी यांचे डूडल (Frank Kameny Google Doodle) साकारत गुगलने त्यांना अभिवादन केले आहे. गूगलने आज बनवलेल्या डूडलमध्ये कॅमिनी यांच्या गळ्यात फुलांच्या रंगीत माळा घातलेल्या दिसतात. गूगलने जून महिन्यात प्रवेश करताच त्यांना श्रद्धांजली अरपण केली आहे. जो जगभरात ‘प्राइज मंथ’ म्हणूनही ओळखला जातो.

Google ने कॅमिनी यांना यूएसमधील एलजीबीटीक्यू (LGBTQ) अधिकार आंदोलनातील एक प्रमुख म्हणून दाखवल आहे. तेसच, दशकांबद्दलच्या प्रगतीसाठी धाडसी मार्ग दाखवल्याबद्दल त्यांचे आभारही मानले आहे. (विविध गूगल डूडलबाबत जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा)

फ्रँक कॅमेनी यांचा जन्म 21 मे 1925 मध्ये न्यूयॉर्क येथील क्वीन्स येथे झाला. त्यांना भौतिकशास्त्रात अभ्यास करण्याची आवड होती. वयाच्या 15 व्या वर्षीच त्यांना क्वींन्स कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले होते. कॅमिनी यांनी हावर्ड विद्यापीठातून भोतिक विज्ञान विषयात डॉक्टरेटची पदवी मिळवली. त्या आधी त्यांनी दुसऱ्या महायुद्धातही सहभाग घेतला. 1957 मध्ये ते आर्मि मॅप सर्विस सोबत एक खगोलशास्त्रज्ञ बनले. मात्र, सरकारकडून LGBTQ समुहाच्या सदस्यांना सरकारी नेकरीत प्रतिबंध करण्यात आल्यानंतर काही महिन्यांनी त्यांनी आपली नोकरी गमावली. फ्रँक कॅमेनी यांनी सरकारवर खटला दाखल केला आणि 1967 मध्ये अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात समलैंगिकांच्या हक्काच्या बजूने पहिली याचिका दाखल झाली.