Valentine’s Day 2024 'Chemistry CuPd' Google Doodle:  व्हॅलेनटाईन्स डे सेलिब्रेशन च्या निमित्ताने गूगल डूडल वर खास मॅच मेकिंग गेम; पहा तुमचा 'एलिमेंट अवतार' कोणता
Google Doodle | Google Homepage

आज (14 फेब्रुवारी) प्रेमाचा दिवस आहे. व्हॅलेंटाइन्स  डे   (Valentine’s Day 2024) च्या निमित्ताने आज गूगल (Google) कडून खास 'केमेस्ट्री' जुळवण्याच्या उद्देशाने डूडल साकारण्यात आले आहे. तुमचा लव्ह मॅच करण्यासाठी खास गेम डूडल (Doodle) मध्ये आहे. होम पेज वर गूगल डूडल वर क्लिक केल्यानंतर Chemistry Cu Pd ओपन होईल त्याच्या प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर तुमचा 'Element' दिसेल. मग आज डूडल वर क्लिक करा आणि रोमॅन्टिक सायन्स एक्सपरिमेंट पहा. केमेस्ट्रीच्या periodic table मधून तुमचा रंग दाखवणारा एलिमेंट कोणता असेल हे या मजेशीर गेम मधून समोर येइल. Happy Valentine's Day 2024 Messages: व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी WhatsApp Status, Quotes, Greetings, HD Images द्वारा शुभेच्छा देऊन साजरा करा प्रेमाचा दिवस! 

संत व्हॅलेंटाईन यांच्या स्मरणार्थ आजच्या दिवसाचं सेलिब्रेशन सुरू झालं आहे. ते गुप्त विवाहांना प्रोत्साहन देत असल्याने सम्राट क्लॉडियस II याने त्यांना तुरुंगात टाकले होते. आजच्या गूगल डूडलचा अर्थ पाहिल्यास तो Cupid शी जोडला जातो. ज्यामध्ये लव्ह आणि रोमान्स ची देवता Cupid ही त्याच्या bow आणि arrow मधून इच्छापूर्ती करते.  Valentine's Day सेलिब्रेशनच्या अनेक कथा आहेत. त्यापैकी एक रोमन सेलिब्रेशन Lupercalia देखील आहे. हा  मॅच मेकिंगचा एक विधी आहे. आजच्या गूगल डूडल मध्ये या गोष्टी अधोरेखित  करण्यात आल्या आहेत.

पहा व्हॅलेनटाईन्स डे 2024 स्पेशल गूगल डूडल

14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाइन्स  डे  आता जगभर प्रेमी युगूल साजरा करतात. यामध्ये आपल्या प्रिय व्यक्तीवर असलेलं आपलं प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आहे. त्यापूर्वी आठवडाभर

व्हॅलेनटाईन्स वीक साजरा केलाअ जातो. त्यामध्येही प्रत्येक दिवसाचं एक वेगळं महत्त्व साजरं करत प्रेमाचा हा आठवडा स्पेशल केला जातो.