Happy Valentine's Day 2024 Messages: प्रेम करणाऱ्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना खूप खास असतो. या महिन्यात लोक प्रेमाच्या रंगात रंगलेले दिसतात. रोज डेपासून सुरू झालेला व्हॅलेंटाईन वीक व्हॅलेंटाइन डेने संपतो. या दिवसाबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. हा प्रेमाचा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन वीक 7 फेब्रुवारीपासून सुरू होतो आणि 14 फेब्रुवारीला संपतो. व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची कथा रोमच्या संत व्हॅलेंटाइनशी जोडलेली आहे. असं म्हटलं जात की, रोमन राजा क्लॉडियस प्रेमाच्या विरोधात होता, कारण त्याचा असा विश्वास होता की जर सैनिक प्रेमात पडू लागले तर त्यांचे मन कामापासून विचलित होईल आणि यामुळे रोमन सैन्य कमकुवत होईल. यामुळेच त्यांनी सैनिकांना लग्न करण्यास बंदी घातली होती. दुसरीकडे संत व्हॅलेंटाईन प्रेमाचा उपदेश करत असत. एवढेच नाही तर त्याने राजाच्या विरोधात जाऊन अनेकांची लग्नेही केली.
सेंट व्हॅलेंटाईनने लोकांचे विवाह लावून राजा क्लॉडियसचा विश्वास चुकीचा सिद्ध केला, ज्यामुळे रोमच्या राजाने त्याला मृत्युदंडाची शिक्षा दिली. यानंतर 14 फेब्रुवारीला संत व्हॅलेंटाइनला फाशी देण्यात आली आणि त्याच दिवसापासून व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास सुरुवात झाली. या दिवसापासूनच रोमसह जगभरात 14 फेब्रुवारी हा प्रेमदिन साजरा करण्याचा ट्रेंड सुरू झाला. या दिवसानिमित्त WhatsApp Status, Quotes, Greetings, HD Images द्वारा तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रिय व्यक्तीला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा देऊन प्रेमाचा दिवस साजरा करू शकता. यासाठी तुम्हाला खालील ईमेज मोफत डाऊनलोड करता येतील.
ना Teddy पाहिजे, ना Kiss पाहिजे, ना Hug पाहिजे,
फक्त तुझी आयुष्यभर साथ पाहिजे…
Happy Valentines Day!
आयुष्यभर साथ देणारी माझी सावली आहेस तू,
माझ्या डोळ्यात नेहमी राहणार, स्वप्न आहेस तू,
हाथ जोडून देवाकडे जे मागितलं होत ते मागणं आहेस तू…
Happy Valentine Day!
काळोखाच्या वाटेवर चालताना,
हातामध्ये तुझाच हात…
धडपडत्या आयुष्याला सावरताना,
आता फक्त तुझीच साथ..
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे!
खरी माणसे ही, जगातील सर्वात सुंदर मुलीवर प्रेम करत नाहीत,
तर ती माणसे, जी मुलगी त्यांचे जीवन सुंदर बनवते तिच्यावर प्रेम करतात…
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे!
तुझ्या अगोदरही कोणी नव्हते,
तुझ्या नंतरही कोणी नसेल,
जो पर्यंत श्वासात श्वास आहे,
माझे प्रेम फक्त तुझ्यावर असेल…
Happy Valentines Day!
व्हॅलेंटाईन डेचा उगम रोमन सणातून झाला. 496 साली जगात प्रथमच व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला. यानंतर पाचव्या शतकात रोमचे पोप गेलेसियस यांनी 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. या दिवसापासून, रोमसह जगभरात दरवर्षी 14 फेब्रुवारी हा दिवस मोठ्या थाटामाटात व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जाऊ लागला.