Akshaya Tritiya 2019: तुमच्या राशी प्रमाणे अक्षय्य तृतीया दिवशी 'हे' दागिने खरेदी करा, ठरेल लाभदायक
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-Pixabay)

Akshaya Tritiya 2019: येत्या 7 मे रोजी अक्षय्य तृतीया साजरी करण्यात येणार आहे. हा दिवस भगवान परशुराम यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. धार्मिक विद्वान यांच्या मते मंगळवारी सकाळी 6.40 वाजल्यापासून ते रात्री 12.26 पर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त आहे. तसेच खरेदी करण्यासाठी रात्री 11.47 पर्यंत शुभ मूहुर्त आहे.

तसेच या दिवशी कोणतीही वस्तू खरेदी केल्यास ती अक्षय्य होते असे मानले जाते. या दिवशी लोक खासकरुन सोने खरेदी करताना दिसून येतात. परंतु जाणकरांच्या मते स्वर्ण आभुषणे खरेदी करण्यासाठी तुमच्या राशीनुसार यंदा दागिने खरेदी करा. ते तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे.(Akshaya Tritiya 2019: अक्षय्य तृतीया दिवशी चुकूनही 'या' गोष्टी करु नका,नाहीतर देवी लक्ष्मी होईल नाराज)

मेष: या दिवषी मेष राशीतील व्यक्तिंनी तांबे आणि सोन्याच्या वस्तू/ दागिने खरेदी करणे फलदायी ठरणार आहे. तसेच गरिबांना गहू दान करा.

वृषभ: वृषभ राशीतील व्यक्तींनी चांदीचे नाणे किंवा चांदीची कोणतीही वस्तू खरेदी करा. त्याचसोबत अन्न आणि वस्र दान करणे तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे.

मिथुन: या राशीतील व्यक्तींनी चांदीचे दागिने किंवा नवीन वस्त्रे खरेदी करा. मूगाची डाळ या दिवशी दान करा.

कर्क: कर्क राशीतील व्यक्तींनी चांदीची भांडी खरेदी करा. शिव उपासना केल्यास तुम्हाला लाभ होईल.

सिंह: सिंह राशीतील व्यक्तींनी सोन्याचे दागिने खरेदी करा. तसेच फूलपात्र दान करा.

कन्या: या राशीतील व्यक्तींनी चांदीची नाणी किंवा स्टिलची भांडी खरेदी करा. तसेच गरिबांना सफेद किंवा हिरव्या रंगाचे वस्त्रदान करा.

तुळ: तुळ राशीतील व्यक्तींनी सोने खरेदी करण्यापेक्षा चांदीची आभुषणे खरेदी करा. हनुमानाची पूजा केल्यास तुमचा दिवस आनंदात जाईल.

वृश्चिक: तांब्याची भांडी खरेदी करा. त्याचसोबत सोन्याचे दागिनेसुद्धा तुम्ही खरेदी करु शकता.

धनु: सोन्याचे दागिने खरेदी करा. शुभलाभ मिळण्यासाठी चण्याची डाळ दान करा.

मकर: मकर राशीतील व्यक्तींनी सोने अथवा चांदीची खरेदी करु शकता. लोखंडाची वस्तू दान केल्यास त्याचा लाभ होईल.

कुंभ: जातक ब्राम्हण आणि साधू संतांना सत्तूचे दान करा. तसेच चांदीचे दागिने तुम्ही खरेदी करु शकता.

मीन: मीन राशीतील व्यक्तिंनी सोन्याचांदीच्या वस्तू खरेदी करण्यासोबत घरात एखादी नवीन वस्तू सुद्धा खरेदी करु शकता.

(Akshaya Tritiya 2019: यंदा 16 वर्षानंतर येणार अद्भुत योग, अक्षय्य तृतीया ठरणार तुमच्यासाठी लाभदायक)

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दान करण्याचे अधिक महत्व आहे. तसेच दान देते वेळी व्यक्तीला दानामध्ये देण्यात येणाऱ्या वस्तूची काळजी घ्यावी लागते. तसेच व्यक्तीने या दिवशी कोणत्याही प्रकारचे चुकीचे काम करु नये असे म्हटले जाते. नाहीतर देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज होण्याची शक्यता असते.