अक्षय्य तृतीया (Photo Credits: Wikimedia Commons)

हिंदू धर्मात वैखाश महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या तृतीयेला अक्षय्य तृतीया असे म्हणतात.. तसेच हिंदू धर्मात प्रत्येक शुभ कार्य करण्यासाठी अक्षय्य तृतीयेचा दिवस सुद्धा लाभदायक मानला जातो. अक्षय्य तृतीया म्हणजे या दिवशी खरेदी केलेली कोणतीही गोष्ट किंवा केलेली गोष्ट नेहमी अक्षय्य राहते असे म्हटले जाते. येत्या 7 मे रोजी अक्षय्य तृतीया साजरी करण्यात येणार आहे.

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दान करण्याचे अधिक महत्व आहे. तसेच दान देते वेळी व्यक्तीला दानामध्ये देण्यात येणाऱ्या वस्तूची काळजी घ्यावी लागते. तसेच व्यक्तीने या दिवशी कोणत्याही प्रकारचे चुकीचे काम करु नये असे म्हटले जाते. नाहीतर देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज होण्याची शक्यता असते. तर चुकूनही अक्षय्य तृतीयेच्या दिवशी 'या' गोष्टी करणे टाळा.

क्रोध करु नका-

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपल्या मनात कोणाबद्दल ही राग व्यक्त करु नये. तसेच देवी लक्ष्मी आणि विष्णुची पूजा केल्यानंतर व्यक्तीने एखाद्याबद्दल क्रोधाची भावना व्यक्त केल्यास त्याच्याजवळ लक्ष्मी वसत नाही.

रिकाम्या हाताने घरी जाऊ नका-

या दिवशी शुभलाभ मिळण्यासाठी सोन्याची वस्तू जरुर खरेदी करा. परंतु रिकाम्या हाताने अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घरी जात असल्यास अशुभ मानले जाते. तसेच सोने खरेदी शक्य नसल्यास कोणतीही वस्तू खरेदी करुन घरी घेऊन जा.

(Akshaya Tritiya 2019: अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? जाणून घ्या काय आहे या दिवसाचे महत्त्व)

पूजेत तुळशीच्या पानांचा उपयोग जरुर करा-

अक्षय्य तृतीया दिवशी लक्ष्मीच्या पूजेसोबत विष्णूची पूजा करण्याचे सुद्धा अधिक महत्व असते. परंतु जरुर लक्षात ठेवा की नैवेद्य दाखवताना तुळशीचे पान त्यावर असणे अत्यावश्यक आहे. नाहीतर व्यक्तीला अशुभ लाभ होते असे म्हटले जाते.

लक्ष्मी-विष्णुची एकत्र पूजा करा-

समृद्धी आणि सौभ्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तींनी चुकूनही सुद्धा भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा एकत्र करायची असते हे विसरु नये. कारण लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघे पती-पत्नी असल्याचे म्हटले जाते

(Happy Akshaya Tritiya 2019: अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा WhatsApp Status, Messenger, GIFs, SMS च्या माध्यमातून देण्यासाठी खास मराठमोळी ग्रिटिंग्स!)

अक्षय्य तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तातील एक दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी सोने खरेदी, मौल्यवान वस्तू खरेदी, घर खरेदी केली जाते. महाराष्ट्रातील लोक या दिवशी त्रेतायुगाचा प्रारंभ झाला असे मानतात. तर उत्तर भारतातील लोक या दिवशी सत्ययुगाचा प्रारंभ झाला असे मानतात.