Gudi Padwa 2021 Mehandi Design: हिंदू नववर्ष, गुढी पाडव्याच्या दिवशी हातावर काढा 'या' सोप्या आणि सुंदर मेहंदी डिझाईन्स
Photo Credit: Pixabay

चैत्र महिन्यातील पहिला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. या दिवशी गुढीपाडव्याचा (Gudi Padwa 2021) सण साजरा केला जातो. यंदा गुढीपाडवा मंगळवार, 13 एप्रिल रोजी आहे.गुढीपाडवा साडेतीन मुहुर्तांपैकी एक. हिंदू संस्कृतीत या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.अवघ्या काही दिवसांवर हा सण आला आहे.नव्या वर्षाची गोडव्याने सुरुवात करण्यासाठी लोक विविध संकल्प करतात. अशातच जर तुम्हाला सुद्धा नवं वर्षाची सुरुवात हातावर छान मेहंदी काढून करायची असेल तर सोप्पी, आकर्षक आणि सुंदर मेहंदीची आयडिया तुमच्या कामी येणार आहे.आज आपण पाहणार आहोत कमी वेळात सुंदर आणि आकर्षक मेहंदी डिझाइन. चला तर मग पाहूयात. (Gudi Padwa 2021 Rangoli Designs: गुढीपाडव्याच्या दिवशी किचनमधील साहित्य वापरून दारासमोर काढा या सोप्या आणि आकर्षक रांगोळी डिझाईन्स )

गुढी पाडवा स्पेशल अरेबिक मेहंदी

गुढी पाडवा स्पेशल डिझाइन मेहंदी

सोपी गुढी पाडवा मेहंदी डिझाइन

लेटेस्ट अरेबिक गुढी पाडवा मेहंदी

गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने त्या दिवशी सोने किंवा नवीन वस्तू खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो. तसंच नवीन वर्ष आपल्यासाठी नवी उमेद, आशा, स्वप्न घेऊन येत असतं. या सर्व मनोकामना पूर्ण करण्याचा ध्यास गुढीपाडव्या निमित्त करुया.