कमी वयात केस पांढरे होण्याची समस्या सतावत असल्यास करा 'या' गोष्टींचे सेवन
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

सध्याची बदलती लाइफस्टाइल पाहता काही जणांना कमी वयातच केस पांढरे होत असल्याची समस्या पाठी लागते. तर कमी वयात केस पांढरे झाल्याने ते तुमच्या पर्सनालिटीला न शोभण्यासारखे असून त्याबाबत चिंता सतावते. फॅशन तर दूर कमी वयात केस पांढरे होणे काहीसे लाजिरवाणे आहे. काही लोकांना शाररिक कमकुवतेमुळे अशा प्रकारची समस्या येते. काहीजण केस पांढरे होत असल्याने गोळ्या सुद्धा घेतात. परंतु गोळ्या घेणे ही बाब चुकीची असून ती तुमच्या आरोग्याला घातक ठरु शकते. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणत्याही गोळ्यांचे सेवन करु नये असे सांगितले जाते.तुम्हाला सुद्धा जर केस पांढरे होण्याची समस्या भेडसावत आहे तर त्यावर आताच उपाय करा. तर जाणून घ्या केस सफेद होत असल्यास कोणत्या गोष्टी खाणे महत्वाचे आहे.(Hair Fall Tip: केसांची गळती थांबवायची आहे? घरीच 'या' पद्धतीने समस्येपासून सुटका मिळवा)

-संत्र्याचे सेवन करा

कमी वयात केस सफेद होत असेल तर त्यापासून सुटका मिळवण्यासाठी संत्रे खा. कारण संत्र्यात विटामीन सी असून ते तुम्हाला कोलेजन प्रोटीनची वाढ करण्यास मदत करतात. संत्रे खाल्ल्याने केस सफेद होण्याची समस्या कमी होण्यासोबत केसांची वाढ होण्यास मदत होते.

-फर्मेन्टेड फुड्स

प्रोबायोटिक नेहमीच आरोग्य स्वस्थ राहण्यासाठी उपयुक्त ठरतात. खासकरुन केसांसाठी या गोष्टीचे सेवन केल्यास तुम्हाला केस सफेद होण्याची समस्या कमी होईल. फर्मेन्टेड फूड्स म्हणजे दही, विनेगर, आवळा सारख्या पदार्थांचा समावेश होतो. काळे केस कायम राखण्यासाठी फर्मेन्टेड फुड्स जरुर खा.

-डार्क चॉकलेट

शरिरात लोह आणि कॉपरची कमी असल्याने केस सफेद होण्याची समस्या सतावते. त्यामुळे डार्क चॉकलेट हे उत्तम पोषक तत्व असून ते सफेद झालेल्या केसांसाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे डार्क चॉकलेटचे सेवन करा.

तसेच मात्र जर तुम्ही घरगुती आणि नैसर्गिक पद्धतीने केस गळतीची समस्या सोडवायची असल्यास मेथी दाण्यांचा उपयोग करा. मेथीचे दाणे तुम्ही सुक्या आवळ्यासोबत वाटून त्याची पावडर बनवू शकता. त्यानंतर ही पावडर तेलामध्ये मिक्स करुन ते केसांना लावा. यामुळे सुद्धा केसांची गळती थांबण्यास मदत होईल.