Lunar Eclipse 2020: येत्या रविवारी म्हण जेच 5 जुलै रोजी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला यंदा चंद्र ग्रहण (Chandra Grahan) आहे. हे वर्ष 2020 मधील चौथं ग्रहण आहे. सलग तिसर्या वर्षी गुरू पौर्णिमेदिवशी (Guru Purnima) चंद्र ग्रहणाचा योग जुळून आला आहे. ही खगोलीय घटना भारतात तरी दिवसा घडणार असल्याने स्पष्टपणे पाहता येणार नाही, मात्र तरीही महत्वाचं म्हणजे ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार, काही राशीच्या व्यक्तींवर याचा प्रभाव मात्र जाणवून येऊ शकतो. यावेळेसचे ग्रहण हे छायाकल्प चंद्र ग्रहण असणार आहे त्यामुळे ग्रहणामध्ये प्रभाव आणि सूतक काळ पाळण्याची प्रथा नाही.उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप आणि आफ्रिकेच्या पश्चिमेकडील काही भागातून ग्रहण दिसणार आहे.या ग्रहांचा कोणत्या राशींवर आणि काय परिणाम होणार हे जाणून घेण्यासाठी खालील माहिती आवर्जून वाचा.Chandra Grahan July 2020 Date And Time: 5 जुलै दिवशी गुरू पौर्णिमा दिवशी छायाकल्प चंद्रग्रहण; भारतामधून मात्र नाही दिसणार
ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार, यावेळेस पाच राशींच्या व्यक्तींवर विशेषप्रभाव जाणवण्याची अंदाज आहेत, यामध्ये मिथुन, सिंह, कन्या, वृश्चिक, धनु या राशींचा समावेश आहे. या राशीच्या व्यक्तींनी यावेळेस काय काळजी घ्यावी याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.
मिथुन
मिथुन राशीच्या व्यक्तींनी आपल्या डोळ्या संबंधित तक्रारी जाणवत असल्यास अजिबात दुर्लक्ष करू नका. या दिवशी तुमचे विनाकारण वाद होण्याची शक्यता आहे, खर्च वाढू शकतो. हे टाळण्यासाठी शक्य तितके मौन पाळल्यास उत्तम.
सिंह
तुम्ही ऑनलाईन खरेदी करत असाल तर या दिवशी जरा सांभाळून कारण आपल्याला आर्थिक फसवणुकीचा सामना करावा लागेल असे योग आहे. तुमच्या कामात अडचणी येऊ शकतात, मात्र प्रभाव सौम्य असल्याने तुम्ही नेहमीपेक्षा अधिक लक्ष देऊन काम केल्यास नुकसान सहन करावे लागणार नाही.
कन्या
शारीरिक आणि मानसिक त्रास या दिवशी जाणवू शकतो. शारीरिक त्रास हा अगदी शुल्लक म्हणजेच पोटदुखी किंवा डोकेदुखी इतकाच असला तरी त्यामुळे चिडचिड आणि मग वाद होण्याची शक्यता आहे. आजूबाजूचे वातावरण फ्रेश वाटत नाही अशी तक्रार तुम्हाला त्रास देऊ शकते. अशावेळी शांत राहणे किंवा आपल्या आवडीची एखादी गोष्ट करणे फायद्याचे ठरेल.
वृश्चिक
पार्टनर सोबत वाद होण्याचे अंदाज आहेत. शांतता न बाळगल्यास विनाकारण वाद वाढत जाऊन अगदी टोकाची भूमिका घेण्याचा सुद्धा विचार डोक्यात येऊ शकतो. त्यामुळे राग, संताप जाणवणार नाही अशा गोष्टीत मन रमवा.
धनु
खर्च खूप वाढेल अशी शक्यता आहे. घराचं सामान आणण्यापासून ते प्रसंगी डॉक्टर पर्यंत कोणत्याही कारणाने खर्च होईल असे प्रभाव तुमच्या राशीत आहेत. त्यामुळे पूर्व तयारी बाळगल्यास उत्तम!
सुतक पाळण्याची आवश्यकता नसली तरी हिंदू मान्यतांनुसार या काळात शुभं काम केली जात नाहीत. प्रामुख्याने नवजात बालकं, गरोदर स्त्रिया यांना विशेष जपलं जातं. मात्र हे करणं हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे. त्याला कोणताही वैज्ञानिकपुरावा नाही.
(टीप- सदर लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा कोणताही हेतू नाही)