घरातील सफेद रंगांच्या भिंती ( फोटो सौजन्य- Pixabay)

सोशल मीडियावर आपण नेहमीच पाहत असलेल्या घरांचे अप्रतिम बांधकाम आणि रंगरंगोटी केलेल्या  घरांच्या भिंतींचा रंग सफेद असतो. पण तुम्हाला माहिती आहे का घराच्या भिंतींना सफेद रंग देण्यामागील महत्व काय आहे? तर जाणून घ्या
-घराच्या भिंती सफेद असल्यास त्यावर छान असे कॅनव्हस पेंटिंग लावल्यास ती भिंत आकर्षक वाटते. तर आवड असल्यास त्यावर तुम्ही स्वत: रंगकाम करु शकता.
- Ecletic पद्धतीच्या लाईट्सचा प्रकाश सफेद रंगांच्या भिंतीवर उठून दिसतो. तर सफेद रंग कोणत्याही रंगाच्या लाईट्स सोबत मिळता जुळता होतो. त्यामुळे बहुदा घरातील दिवे आणि सफेद रंगांच्या भिंती छान वाटतात.
-सफेद रंग हा स्वच्छतेचेसुद्धा प्रतीक मानले जाते. तसेच घरातील सफेद रंगांच्या भिंतीमुळे घरात प्रकाश सातत्याने खेळत राहतो.
-घरातील भिंती आकर्षक दिसण्यासाठी त्यावर विविध पद्धतींची डिजाईन असलेल्या वस्तूंचा उपयोग केला जातो. त्यामुळे सफेद रंगांच्या भिंतींना ग्लॅमरस लुक येऊन पाहणाऱ्याचे मन प्रसन्न करते.

- सफेद रंग हा शुद्धता आणि सकारात्मक गोष्टींचे प्रतीक मानले जाते. त्याचबरोर अचूक गोष्टी करण्यासाठी ही सफेद रंगाचा वापर केला जातो. तर सफेद रंग असलेल्या भिंतींची विशेष काळजी घेणे फार अवघड असते.

- सफेद रंग असलेल्या घरातील खोली मोठ्या दिसतात. तर गडद रंग असलेल्या घराच्या खोली लहान दिसतात. मात्र सफेद रंगामुळे घरात नैसर्गिक प्रकाशझोताची किरणे दिसून येतात.